मुंबईकरांनो, जागे व्हा... समुद्राच्या या खवळणाऱ्या लाटा तुम्हाला गिळून टाकणार आहेत.... कारण सात बेटांनी तयार झालेली मुंबई आता पुन्हा एकदा पाण्याखाली जाणार आहे...कारण मुंबई लवकरच बुडणार आहे... हा इशारा दिलाय... मॅकगिल विद्यापीठाच्या अभ्यासकांनी....यात नेमकं काय म्हटलयं.
वाटणाऱ्या या लाटा तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी पुढे सरसावताय...लवकरच मुंबई पाण्याखाली बुडणार आहे.. असं आम्ही नाही.. तर मॅकगिल विद्यापीठाच्या एका अभ्यासात म्हटलयं...जीवाश्म इंधनाचा वापर थांबला नाही तर 21 व्या शतकाच्या अखेरीस जगभरातील अनेक किनारपट्ट्यांवरील शहर पाण्याखाली जाऊ शकतात...
हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढ
मुंबईसह किनारपट्टीवरील शहारांना हवामान बदलाचा फटका
पेट्रोल- डिझेलच्या अतिवापरानं हिमनग वितळण्याची शक्यता
समुद्र पातळी 0.5 मीटर झाल्यास 30 लाख इमारती बुडणार
समुद्र पातळी 5 मीटरहून अधिक झाल्यास 10 कोटी इमारती बुडणार
आफ्रिका, आग्नेय आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या किनारी भागात हवामान बदलामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे... भारतीय उपखंडात हा धोका कसा आहे.
मुंबई- 21.8 टक्के पाण्याखाली
पणजी आणि चेन्नई- 5 ते 10 टक्के पाण्याखाली
दक्षिण भारत - 5 टक्के पाण्याखाली
मुळात ही समस्या एका शहरापुरती किंवा देशापुरती मर्यादीत नाहीय..तर अख्ख जग या हवामान बदलाच्या कचाट्यात सापडलयं...मुंबईत फुटभर जागेसाठी लाखो रुपये मोजले जातात... मात्र आता मुंबई बुडणार असल्यानं हे सगळं एका क्षणात उद्धवस्त होणार आहे... त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी वेळीच पर्य़ावरणाची साद ऐकाय़ला हवी.. नाहीतर माणसाचं पृथ्वीवरच अस्तित्वच धोक्यात येईल..., हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.