Monkeypox: कोरोना व्हायरसनंतर मंकीपॉक्सची दहशत; मंकीपॉक्स व्हायरसचा 116 देशांना धोका

Monkeypox: आता बातमी आहे सगळ्यांचं टेन्शन वाढवणारी.मंकीपॉक्सचा रुग्ण देशात आढळला आणि धक्कादायक माहिती समोर आलीय. तब्बल 116 देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेयत. मात्र, हा एकच व्हायरस नाहीये. पृथ्वीवर 10 नॉनिलियन व्हायरस अॅक्टीव्ह आहेत...यामुळे आता सरकार अलर्ट झालंय. यावरचा पाहुयात खास रिपोर्ट..
Monkeypox: कोरोना व्हायरसनंतर मंकीपॉक्सची दहशत; मंकीपॉक्स व्हायरसचा 116 देशांना धोका
Monkeypoxsaam tv
Published On

मंकीपॉक्स व्हायरस 116 देशात धुमाकूळ घालतोय.अनेकांचा बळीही गेलाय.त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालीय.याचं संक्रमण 2022 पासून होत असून, हळूहळू हा व्हायरस सगळ्या देशांमध्ये पाय रोवतोय.आणि हा व्हायरस लोकांचा जीवही घेत असल्याने चिंतेचा विषय बनलाय.धक्कादायक बाब म्हणजे, पृथ्वीवर तब्बल 10 नॉनिलियन म्हणजे 1 वर 30 शून्य...इतके व्हायरस अॅक्टीव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे व्हायरस नाही...त्यामुळे अशा व्हायरसमुळे चिंता वाढलीय.

Monkeypox: कोरोना व्हायरसनंतर मंकीपॉक्सची दहशत; मंकीपॉक्स व्हायरसचा 116 देशांना धोका
Monkeypox: मंकी पॉक्सचा धोका कोणाला, कसे आहेत यावर उपचार? पाहा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

मंकीपॉक्सचा 116 देशांना धोका

यामुळेच आता केंद्र सरकार सतर्क झालं.मंकीपॉक्सवर वेळीच आळा घालण्यासाठी सरकार अलर्ट झालं असून, मार्गदर्शक सूचना जारी केल्यायत.

मंकीपॉक्सबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

अनावश्यक भीती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता तपासा

मंकीपॉक्स आजाराबाबत जनजागृती करा

रुग्णालयातील विलगीकरण कक्षांचा आढावा घ्या

आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करा

अशा सूचना केंद्राने राज्यातील आरोग्य यंत्रणांना दिल्यायत...मंकीपॉक्स व्हायरस हा वेगानं वाढतोय...प्राण्यांमधूनही पसरत असल्य़ाने वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आता सरकार अलर्ट असून, मंकीपॉक्स होऊ नये यासाठी तुम्हीही काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com