Money Rain
Monkey Rain Money Saam tv

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Monkey Rain Money : हमीदपूरमध्ये पैशांचा पाऊस पडला. त्यानंतर पैसे उचलण्यासाठी लोकांची झुंबड झाली.
Published on
Summary

हमीरपूरमध्ये माकडाने झाडावरून 10,800 चे नोटा फेकल्या

लोकांनी पैसे गोळा करत झुंबड उडाली

दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले

घटना ठरली गावभर चर्चेचा विषय

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये एक भन्नाट घटना घडली. हमीदपूरमध्ये एका माकडाने झाडावर बसून पैशांचा पाऊस पाडला. या माकडाने झाडावर बसत एका दुकानदाराचे ११ हजार रुपये जमिनीवर फेकले. त्यानंतर पैसे गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. हमीरपूरच्या मौदेहा कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

Money Rain
India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

मीडिया रिपोर्टनुसार, हमीरपूरच्या मराठीपूरमध्ये राहणारे बाल गोपाल हे पूजेचं साहित्य विक्री करण्याचं काम करतात. त्यांच्या दुकानाभोवती माकडे फिरत असतात. त्यातील एका माकडाने बाल गोपाल यांची पैशांची बॅग पळवली. त्या बॅगेत एकूण १० हजार ८०० रुपये होते. बॅग पळवल्यानंतर माकड थेट झाडावर पोहोचला. झाडावर बसलेल्या माकडाने बॅगेतील पैसे जमिनीवर फेकले. माकडाने पैसे फेकल्यानंतर लोकांची एकच झुंबड उडाली.

Money Rain
TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

माकडाने झाडावरून पैसे फेकल्यानंतर लोकांनी गैरफायदा घेत खिशात नोटा टाकल्या. जितके पैसे मिळेल, तितके पैसे लोकांनी उचलले. काही लोक माकडाला पैसे फेकताना पाहण्यात दंग राहिले. काहींनी माकडाने फेकलेले पैसे उचलून दुकानदाराला दिले. या घटनेची गावात एकच चर्चा झाली. माकडाच्या कृत्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. माकड तासभर झाडावरून पैसे फेकत होता.

Money Rain
Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

काही लोकांनी संधीचा गैरफायदा उचलला. माकडाने पैसे फेकल्यानंतर काही लोकांनी पैसे घेऊन पळ काढला. यात दुकानदाराचं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे दुकानदाराला रडू कोसळलं. काही लोकांनी दुकानदाराची मदत केली. मात्र, बहुतांश लोक दुकानदाराचे पैसे घेऊन फरार झाले. या दुकानदाराला फक्त ६ हजार रुपये परत मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com