हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील काँग्रेस नेते प्रेम शर्मा ( Congress leader Prem Sharma) यांच्या नातवाचा चंदीगडला लागून असलेल्या मोहाली (Mohali) येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण दोन जणांनी आपला जीव गमवला आहे. सध्या पंजाब पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोहाली येथे रविवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. (Latest Accident News)
सेक्टर 78-79 च्या लाईट पॉइंटवर स्कॉर्पिओ आणि इनोव्हा यांच्यात जोरदार टक्कर झाली (Scorpio Innova Accident) होती. यादरम्यान इनोव्हा सुमारे 20 फूट उडी खाली कोसळली. त्यामुळे इनोव्हा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळी स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील तरुणालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भरधाव वेगामुळे अपघात
वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत (Accident News) आहे. पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात इनोव्हा चालक मोहम्मद अस्लम (जम्मू-काश्मीर येथील कार डीलर)चा जागीच मृत्यू झाला आहे. स्कॉर्पिओमध्ये प्रवास करणारा तरूण चंदीगड सेक्टर-10 येथील डीएव्ही कॉलेजमधील विद्यार्थी आहे. त्याचं नाव आर्य शर्मा (21) असल्याचं समोर आलं आहे. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आर्य हा कुल्लू येथील रायसन येथील रहिवासी (Mohali Road Accident) होता. तपासाच्या आधारे सोहाना पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालक अर्जुन याच्याविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यचे आजोबा कुल्लूमध्ये काँग्रेसचे नेते आहेत. आर्य हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
दोन्ही वाहनांचं नुकसान
पहाटे स्कॉर्पिओ स्वार तरुण ढाब्यावर जेवण करून चंदीगड सेक्टर 44 ला परतत होता. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातातील तिन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी इनोव्हा चालकाला मृत घोषित केलं होतं. तर आर्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Road Accident) आहे.
पोलीस तपासादरम्यान, इनोव्हा चालक मूळचा जम्मू-काश्मीरचा असून तो कार डीलर म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे. तो गुजरातमधून सेकंड हँड कार आणायचा आणि जम्मू-काश्मीरमधील त्याच्या घरी विकायचा. सध्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.