Who is Ram Mohan Naidu: केंद्रात सर्वात तरुण मंत्री, ३६व्या वर्षी घेतली शपथ? कोण आहेत राम मोहन नायडू?

Who is Ram Mohan Naidu: राम मोहन नायडू कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते आतापर्यंतचे सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनलेत. त्यांनी 36 वर्षीय केंद्रीय मंत्रिपद मिळवलंय. राम मोहन नायडू हे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या जवळच्या मित्रांमध्ये गणले जातात. सध्या नायडू हे टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
Who is Ram Mohan Naidu: केंद्रात सर्वात तरुण मंत्री, ३६व्या वर्षी घेतली शपथ? कोण आहेत  राम मोहन नायडू?
Who is Ram Mohan Naidugulte

नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, नितीन गडकरी, ललन सिंह अशा अनेक दिग्गज नेत्यांनी शपथ घेतलीय. दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या तेलुगु देसम पक्षातील राम मोहन नायडू किंजरापू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांनी देखील शपथ घेतलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मोहन नायडू हे ३६ वर्षाचे आहेत. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण मंत्री असतील. त्याचवेळी पेमसानी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतील. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण वयात मंत्री बनणारे राम मोहन नायडूंबद्दल जाणून घेऊ.

कोण आहेत राम मोहन नायडू?

राम मोहन नायडू हे माजी केंद्रीय मंत्री आणि टीडीपीचे नेते येरान नायडू यांचे पुत्र आहेत. राम मोहन नायडू यांचा जन्म १८ डिसेंबर १९८७ रोजी निम्मडा येथे झाला. त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, आरकेपुरम येथून प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेतील लाँग आयलँडमधून इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगमध्ये एमबीए केले. वर्ष २०१२ मध्ये राम मोहन नायडू यांच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर नायडू भारतात परतले आणि राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले.

सलग तीन वेळा खासदार

राम मोहन नायडू हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकाकुलममधून खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी ते २६ वर्षांचे होते. १६व्या लोकसभेतील ते दुसरे सर्वात तरुण खासदार ठरले होते. यानंतर ते २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि आता २०२४ मध्येही त्यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय असे तिसऱ्यांदा संसदेत पोहोचले.

राम मोहन यडू हे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात. सध्या नायडू हे टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राम मोहन नायडू यांना २०२० मध्ये संसदरत्न पुरस्कारही मिळालाय. कृषी, पशुसंवर्धन, रेल्वे, गृह व्यवहार, पर्यटन आणि संस्कृती यासह संसदेच्या अनेक समित्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

Who is Ram Mohan Naidu: केंद्रात सर्वात तरुण मंत्री, ३६व्या वर्षी घेतली शपथ? कोण आहेत  राम मोहन नायडू?
Modi 3.0 Cabinet: पहिल्याच संधीत मंत्रिपद; नगरसेवक ते खासदार असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com