Shocking News: मार्केटमध्ये जाताना अनर्थ घडला, खिशातील मोबाइलचा अचानक स्फोट, तरुण गंभीर जखमी, प्रायव्हेट पार्ट...

Mobile Explosion Horror: पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shocking News: मार्केटमध्ये जाताना अनर्थ घडला, खिशातील मोबाइलचा अचानक स्फोट, तरुण गंभीर जखमी, प्रायव्हेट पार्ट...
Mobile Explosion HorrorSaam Tv
Published On

पँटच्या खिशामध्ये ठेवलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाला. मोबाइलच्या स्फोटामुळे तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये घडली. तरुण दुचाकीवरून मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानक त्याच्या मोबाइलचा स्फोट झाला आणि तो दुचाकीवरून रस्त्यावर पडला. या दुर्घटनेमध्ये तो गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये राहणारा १९ वर्षीय अरविंद पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करतो. नेहमीप्रमाणे अरविंद भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जात होता. यादरम्यान टोल टॅक्सजवळ त्याच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. ज्यामुळे तो महामार्गावर खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे त्याच्या गुप्तांगाला देखील गंभीर दुखापत झाली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे अरविंदची अवस्था खूपच गंभीर झाली. त्याला तात्काळ शाजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Shocking News: मार्केटमध्ये जाताना अनर्थ घडला, खिशातील मोबाइलचा अचानक स्फोट, तरुण गंभीर जखमी, प्रायव्हेट पार्ट...
Shocking News: आधी शाळेत घुसला, कपडे काढले, वर्गातून मुलांना बाहेर काढलं, मग महिला शिक्षकाबरोबर...VIDEO व्हायरल..

खिशात मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे अरविंदच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या. त्याचे अंडकोष फुटले. त्याच्यावर सुरूवातीला सारंगपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी शाजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अरविंदच्या भावाने सांगितले की, 'तो जुना मोबाइल वापरत होता. रात्रभर त्याने माबाइल चार्जिंगला ठेवाल होता. त्यानंतर तो मोबाइल खिशात घालून मार्केटमध्ये निघून गेला आणि ही घटना घडली.' या घटनेमुळे अरविंदच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Shocking News: मार्केटमध्ये जाताना अनर्थ घडला, खिशातील मोबाइलचा अचानक स्फोट, तरुण गंभीर जखमी, प्रायव्हेट पार्ट...
Shocking News: प्रेमाचा असाही अंत! वहिनी दीराच्या प्रेमात अखंड बुडाली, पण शेवटी विष प्राशन करून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com