
मिझोराममध्ये पहिली ट्रेन सुरु झाली आहे. भारतात जवळपास १७२ वर्षांपूर्वी रेल्वे सुरु झाल्याचा इतिहास आहे. मात्र, मिझोराममध्ये अजूनपर्यंत एकही रेल्वे धावली नव्हती. दरम्यान, आज मिझोराममध्ये रेल्वेचं उद्घाटन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेचं उद्घाटन केलं आहे. यामुळे भारतीय रेल्वेचं नेटवर्क अजून वाढणार आहे. मिझोराममध्ये रेल्वे सुरु होऊन एक नवीन इतिहास रचला आहे. (Mizoram First Railwau)
८०७० कोटी रुपये खर्च
मिझोराममध्ये रेल्वे सुरु करण्यासाठी जवळपास ८०७० कोटी रुपये खर्च आला आहे. यामुळे मिझोराम भारतीय रेल्वेमध्ये सामील झाले आहे. डोंगर दऱ्यांच्या भागात रेल्वे सुरु करणे हे खूप जास्त अवघड होते. सर्व भौगोलिक परिस्थिती समजून घेऊन ४५ बोगदे खोदण्याचे काम खूप अवघड होते. हे संपूर्ण काम आता पूर्ण झाले असून देशात अजून एक नवीन रेल्वे सुरु झाली आहे. यामध्ये ५५ मोठे पूल आणि ८८ लहान पुल बांधण्यात आला आहे. यातील एक पुल हा दिल्लीच्या कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे.
नॉर्थईस्ट रेल्वेनुसार, मिझोराममधून सुटणारी राजधानी एक्सप्रेम २,५१० किलोमीटर लांब अंतर गाठणार आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी ४३ तास २५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. या ट्रेनचा स्पीड ५७.८१ किलोमीटर प्रति तास असणार आहे. या मार्गात रेल्वे अनेक ठिकाणी थांबे घेणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मालगाडी सेवा ही लगेच सुरु होणार आहे. रविवारपासून प्रवाशांसाठी ट्रेन सुरु केली जाणार आहे. यामध्ये दिल्लीला जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेस, कोलकत्ता ट्राय-वीकली एक्सप्रेस, गुवाहाटी साठी मिझोराम एक्सप्रेस असणार आहे. या रेल्वे लाइनचा विस्तार करणार असल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
ट्रेनचा मार्ग आणि वेळापत्रक (Mizoram Railway Timetable)
आज सकाळी २० डब्बे असणारी ट्रेन आयजोल येथून रवाना होणार आहे. ही ट्रेन सोमवारी सकाळी दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवर पोहचणार आहे.
यानंतर 20597 ट्रेन १९ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. ही ट्रेन रोज शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजता सुटणार आहे. ही ट्रेन सोमवारी आनंद विहार स्टेशनवर पोहचणार आहे. त्यानंतर 20598 ही ट्रेन परत येणार आहे. ही ट्रेन सोमवारी ७.५० वाजता आनंद विहार येथून निघणार आणि मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता सैरांग येथे पोहचणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.