तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? इराणवर होणार विध्वसंक हल्ला?

iran war : अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे... त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगी नेमकी कधी पडणार? पिझ्झा इंडेक्सचा इराणवरील हल्ल्याशी काय संबंध आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
iran war
iran war Saam tv
Published On

अमेरिकेनं आपलं सर्वात शक्तिशाली नौदल आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर ठेवलंय. तर इराणच्या सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवरून संपूर्ण जगाची धडधड वाढलीय. अशातच अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे...इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याशी संबंधित कोणते संकेत समोर आलेत पाहूयात...

iran war
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

जेव्हा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या आसपासच्या पिझ्झा स्टेअर्समध्ये पिझ्झाच्या ऑडर्स वाढतात.. तेव्हा मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता असते... जून 2025 मध्ये अमेरिकेने इराणवर हल्ला केला तेव्हा पिझ्झा इंडेक्समध्येही मोठी वाढ झाली. आताही पेंटागॉनमधील पिझ्झा इंडेक्समध्ये वाढ झालीय...

तर दुसरा संकेत म्हणजे, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे इस्त्रायली हवाई हद्दीतून बाहेर पडलेत... 13 जून 2025 लाही इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता, तेव्हाही नेत्यानाहूंचे विमान इस्त्रायलबाहेर गेले होते... त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे, जेव्हा मोठ्या युद्धाचा धोका असतो तेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत होते... आताही हाच धोका ओळखून जगभरातील देश धान्य साठा करत आहेत...

iran war
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान अमेरिकेचे कोणतेही विमानवाहू जहाज मध्यपूर्वेत उपस्थित नाही... अशा परिस्थितीत इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांना इतर देशांच्या हवाई तळांचा वापर करावा लागेल... त्यामुळे अमेरिका इराणवर हल्ला करेल का? युद्ध होईल की नाही, हे काळच सांगेल. पण इतिहासाची पानं उलटली तर हे पिझ्झा इंडेक्सपासून ते अन्न साठ्याचे तिन्ही 'संकेत' खोटे ठरलेले नाहीत... त्यामुळे 2025 मध्ये इस्त्राईनने केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा 2026 मध्ये इराणवर मोठ्या लष्करी कारवाईची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com