LinkedIn layoffs: नोकरी शोधण्यास मदत करणारी LinkedIn कंपनीच करणार कर्मचारी कपात, 716 कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता

Latest News: यासोबतच लिंक्डइन कंपनीने आपले चायनीज जॉब अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप देखील बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
LinkedIn
LinkedInSaam TV

layoffs News: जगावर सध्या आर्थिक मंदीचे (Economic Recession) सावट आहे. या आर्थिक मंदीमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. अमेरिका (America) आणि युरोपमधील (Europe) मंदीचा सर्वात मोठा फटका टेक क्षेत्रातील नोकऱ्यांना बसला आहे.

आतापर्यंत गुगल (Google), मेटा (Meta), अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि ट्वीटर (Twitter) यासारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. टेक क्षेत्रात टाळेबंदी करणाऱ्या कंपन्यांच्या या यादीत आता मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या (Microsoft Corporation) मालकीच्या लिंक्डइन (LinkedIn) या कंपनीचेही नाव जोडले गेले आहे.

LinkedIn
Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बस पुलावरुन कोसळली, 15 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

716 कर्मचार्‍यांना काढणार -

नोकरी शोधण्यासाठी सर्वांना मदत करणाऱ्या लिंक्डइन कंपनीनेच कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपल्या 716 कर्मचार्‍यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच लिंक्डइन कंपनीने आपले चायनीज जॉब अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅप देखील बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

LinkedIn
Uttar Pradesh Crime: मुलाच्या हत्येचा घेतला भयंकर बदला! आधी स्वतःच जामीन मिळवून दिला अन्...

कमाई वाढल्यानंतरही घेतला निर्णय -

महत्वाचे म्हणजे, लिंक्डइनमध्ये 20,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. मागच्या वर्षी प्रत्येक तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा स्थितीत नफा वाढल्यानंतरही कंपनीने घेतलेला कर्मचारी कपातीचा निर्णय आश्चर्यकारक आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लिंक्डइनने जागतिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LinkedIn
Sharad Pawar News: 'हा आमच्या घरातला प्रश्न... 'सामना' अग्रलेखावरुन शरद पवारांनी राऊतांना सुनावले खडेबोल

सीईओंनीच कर्मचाऱ्यांना पाठवला मेल -

लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन रोस्लान्स्की यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून माहिती दिली आहे की, बदलत्या वातावरणात आम्ही आमच्या ग्लोबल बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मोठे बदल केले आहेत आणि चाइनीज जॉब अ‍ॅप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपनीतील एकूण 716 लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. सेल्स, ऑपरेशन आणि सपोर्ट टीममध्ये कर्मचारी कपात केली जाणार आहे. याबाबत कोणताही निर्णय लवकर घेता येईल.

250 जणांना मिळणार नोकऱ्या -

नोकर कपातीव्यतिरिक्त सीईओंनी नवीन नोकरीबद्दल देखील माहिती दिली आहे. कंपनीत केलेल्या बदलांनंतर एकूण 250 नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे. ते देखील या भरतीसाठी अर्ज करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com