Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बस पुलावरुन कोसळली, 24 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

MP Bus Accident: घटनास्थळावर स्थानिक आणि पोलिसांडून बचावकार्य सुरु आहे.
Madhya Pradesh Bus Accident
Madhya Pradesh Bus Accident ANI

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 24 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील संशय आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर स्थानिक आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरु आहे. बस चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Madhya Pradesh Bus Accident
Sharad Pawar In Satara : शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार ? शिंदे- फडणवीस सरकारला शरद पवारांनी दिला माेलाचा सल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी प्रवासी बसला मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस पुलाचा संरक्षण कठडा तोडून नदी कोसळली. 50 फूट उंच पुलावरुन ही बस नदीमध्ये कोसळली. ऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांचा आकडा 24 वर पोहचला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण आहे की बसचे मोठे नुकसान झाले आहे. या बसमधून 45 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. हा अपघात कसा झाला याचे नेमके कारण समोर आले नाही. पण चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Madhya Pradesh Bus Accident
Manipur Violence: शिंदे-फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

दरम्यान, खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मध्य प्रदेश सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपयांची तत्काळ आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com