Sharad Pawar News: 'हा आमच्या घरातला प्रश्न... 'सामना' अग्रलेखावरुन शरद पवारांनी राऊतांना सुनावले खडेबोल

Sanjay Raut On Sharad Pawar: सामना अग्रलेखातून 'शरद पवार वारसदार तयार करण्यात अपयशी ठरले' अशी टीका केली होती.
 Sharad Pawar - Sanjay Raut News
Sharad Pawar - Sanjay Raut NewsSaam TV
Published On: 

ओंकार कदम, सातारा...

Sharad Pawar On Samana Agralekh: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट झाला असला तरी राजकीय वर्तुळात त्याची अजूनही चर्चा सुरू आहे. शरद पवारांचा आधी राजीनामा आणि नंतर तो मागे घेण्याचा निर्णय यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावरुनच सामना अग्रलेखातून शरद पवार वारसदार तयार करण्यात अपयशी ठरले अशी टीका केली होती.

सामना मधील संजय राऊतांच्या (Sanjay Raut) या टीकेला शरद पवार यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी यावरुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

 Sharad Pawar - Sanjay Raut News
Pune Fraud University: धक्कादायक! पुण्यात १० वी पास करणाऱ्या बनावट विद्यापीठाचा पर्दाफाश; ४० ते ६० हजारात देत होते बोगस पदव्या

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा (Satara) दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सामना मधील त्या टीकेचा समाचार घेतला. (Latest Marathi News)

काय म्हणाले शरद पवार..

"आम्ही काय केलंय हे त्यांना माहिती नाही. आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पक्षाचे सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतो. हा आमच्या घरातला प्रश्न असतो. आमच्या प्रत्येक सहकाऱ्याला हे माहिती असतं की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्वाची फळी पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना आहे," असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 Sharad Pawar - Sanjay Raut News
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि ST बसचा भीषण अपघात; 18 जखमी, एक प्रवासी गंभीर

तसेच "पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे," असेही शरद पवार यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com