Mexico Supermarket : सुपरमार्केटमध्ये अग्नितांडव! लहान मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू

mexico supermarket fire causes investigation 23 killed blaze : मेक्सिकोच्या सोनारामध्ये सुपरमार्केटला भीषण आग लागून २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. डे ऑफ द डे उत्सवादरम्यान ही दु:खद घटना घडली. आगीचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
Fire
Fire Saam TV Marathi (संग्रहित छायाचित्र)
Published On

Mexico Supermarket Fire: मेक्सिकोमधील सोनारामध्ये सणाचा उत्सव क्षणात दु:खात बदलला. सुपरमार्केटमध्ये लागलेल्या आगीमध्ये २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत २० जण जखमी असल्याची माहितीही समोर आली आहे. ही घटना डे ऑफ द डे उत्सवावेळी घडली आहे. राष्ट्रपती शीबबाम यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.

उत्सवामुळे सुपरमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात आला होता. विकेंड असल्यामुळे खरेदीसाठी अनेकजण या सुपरमार्केटमध्ये आले होते. त्याचवेळी अचानक आग लागल्याची घटना घडली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Fire
Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

या अग्नितांडवात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त जणांना दुखापत झाली आहे. यामधील काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृताची संख्या आणखी वाढू शकते. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. सुपरमार्केटमध्ये नेमकी आग कशामुळे लागली? याचा तपास करण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Fire
Local Body Election : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता, महायुतीच्या मंत्र्याने निवडणुकीचं वेळापत्रकच सांगितलं

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्फोट किंवा आगीचे कारण विजेचा बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन प्रमुखांनी सांगितले की स्फोट झाला की नाही हे निश्चित करण्यासाठी अद्याप चौकशी सुरू आहे. हर्मोसिलो नगरपालिकेकडून हा दहशतवादी हल्ला नसून दुर्घटना असल्याचे सांगितलेय.दरम्यान, राज्यपालाकडून या दुर्घटेनची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Fire
Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CCTV व्हिडिओ समोर

मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी X वर पोस्ट करत या दुर्घटेनाबाबत दु:ख व्यक्त केलेय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "या भयानक अपघातात जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. सरकारी मदत पथके घटनास्थळी पोहोचली आहेत." दरम्यान, सुपरमार्केटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी ४० टीम सदस्य आणि १० रुग्णवाहिका सहभागी होत्या.सध्या आगीवर नियंत्रण मिळवणयात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. बचाव पथकाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Fire
दारातून येणारे रक्त पाहिले अन् शेजारी हादरले, घरातच पाहातच पोलीसही चक्रावले, 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीचा भयानक शेवट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com