Mens Commission: महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग असावा, अशी मागणी का होतेय?

Mens Commission India: बंगळुरुमध्ये राहणाऱ्या अतुल सुभाषचे आत्महत्याप्रकरण गाजले. त्यानंतर देशभरातून महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगाची स्थापना असावी अशी मागणी देशभरात केली जात आहे.
Men's Commission
Men's CommissionCanva
Published On

Mens Commission: बंगळुरुमध्ये राहणाऱ्या अतुल सुभाष आत्महत्याप्रकरणामुळे खळबळ माजली होती. पक्षपाती कायद्यांमुळे पुरुषांचा होणाऱ्या छळाचे प्रमाण वाढल्याचे अतुल सुभाष प्रकरणावरुन अधोरेखित झाले. अध्यात्मिक गुरु आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा बलिया यांनी देशात पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. दिवसेंदिवस पुरुषांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ही संस्था स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

"खोटे आरोप, अन्यायकारक वागणूक यासारख्या असंख्य आव्हानांना पुरुष सामोरे जात असतात. तेव्हा पुरुषांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना होणे महत्त्वाचे आहे", असे बाबा बलिया यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी वृद्ध पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने देशात पालक आयोग देखील असावा असे मत व्यक्त केले.

पद्मश्री बाबा बलिया म्हणाले, "आम्ही महिला आयोगाचे स्वागत करतो पण आता पुरुष आयोगाचीही गरज आहे. याबाबत आम्ही चर्चा करु आणि लवकरच यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव देखील घेऊ. काही महिला कायद्यांच्या तरतुदींचा गैरवापर करतात. यामुळे समाजात हुंडाबळीमुळे त्रस्त असलेल्या पुरुषांचे प्रमाण वाढत आहे. समाजात समतोल निर्माण करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. सध्या महिला आयोग आधीपासून अस्तित्त्वात आहे. आता पुरुषांसाठीही असाच आयोग स्थापन झाल्यास त्यांच्या समस्या दूर होतील आणि समतोल साधता येईल." त्यांनी पुरुष आयोगासह पालक आयोग स्थापन करण्यावर भर दिला आहे.

Men's Commission
Karnataka Temple: 'सासू लवकर मरू दे', नोटेवर लिहिलं अन् दानपेटीत टाकलं, अजब गजब नवसाची अख्ख्या गावात चर्चा

अतुल सुभाष प्रकरणानंतर देशभरातून पुरुषांच्या हक्कांसाठी शासकीय संस्था असावी अशी मागणी व्हायला लागली. गुजरातच्या सूरतमध्ये काही पुरुषांनी एकत्र येत आंदोलन केले. पक्षपाती कायद्यांमुळे बऱ्याच पुरुषांना छळाचा सामना करावा लागतो. याच्या निषेधामध्ये त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले. त्यांनी 'मॅन नॉट एटीएम' 'मेन्स राईट मिन्स ह्यूमन राईट' अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी नॅशनल क्राईम ब्यूरोची आकडेवारी सादर केली. या अहवालामध्ये दरवर्षी १,२२,००० पेक्षा जास्त पुरुष छळाला कंटाळून आत्महत्या करतात असे नमूद होते.

Men's Commission
chandrababu naidu : चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; जाणून घ्या कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com