Karnataka Temple: 'सासू लवकर मरू दे', नोटेवर लिहिलं अन् दानपेटीत टाकलं, अजब गजब नवसाची अख्ख्या गावात चर्चा

Kalaburagi temple news: २० रूपयाच्या नोटेवर 'सासू लवकर मरू दे' असं लिहित केलं दान. २० रूपयांवर लिहलेली ही गोष्ट पाहून अनेकांनी आश्चर्य तर व्यक्त केलंच. सोबत मंदिर व्यवस्थापनाला देखील धक्का बसला आहे.
karnataka News
karnataka NewsSaam Tv News
Published On

सून आणि सासूमध्ये 'तू तू मैं मैं' होत असते. मात्र एका व्यक्तीनं 'माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे' असं २० रूपयाच्या नोटीवर लिहून दानपेटीत दान केलंय. मंदिरातील दान पेटी उघडल्यानंतर ही २० रूपयांची नोट सापडली. २० रूपयांच्या नोटेवर लिहलेली ही गोष्ट पाहून अनेकांनी आश्चर्य तर व्यक्त केलंच. सोबत मंदिर व्यवस्थापनाला देखील धक्का बसला आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती. दानपेटीत २० रूपये सापडले. २० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं 'माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे' असं लिहिलेलं आढळलं.

karnataka News
Karnataka News: कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

भाग्यवंती देवीकडे नवस मागितला

भाग्यवंती मंदिरातील दानपेटीतील रक्कमेची दर महिन्याला मोजणी होते. मंदिराची दानपेटी उघडून नोटा मोजल्या गेल्या. तसंच किती तोळे सोने - चांदी दान करण्यात आले, याची माहिती देण्यात येते. भाग्यवंती मंदिर हे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात भावीक लाखो रूपये आणि दागिने दान करतात. पण या सगळ्यात २० रूपये नोटाची चर्चा होत आहे. ज्यात एका व्यक्तीनं आपल्या सासूचा मृत्यू होवो. असं जणू साकडं देवीकडे घातले आहे.

karnataka News
Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्री असताना आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांना अटक झाली? आता आणखी एक मुख्यमंत्री रडारवर

मंदिराच्या दानपेटीत मोजणी केली असता, ६० लाख रूपये रोख, १ किलो चांदी आणि २०० तोळे सोन्याचे दागिने दान करण्यात आले. मात्र, या सगळ्यात २० रूपयाच्या नोटीनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. खरंतर लोक आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. साकडं घालतात. मात्र, अज्ञात व्यक्तीनं आपल्या सासूच्या मृत्यूची प्रार्थना केली आहे. ज्याची चर्चा कर्नाटकात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com