
मेघालयमध्ये भाजपप्रणीत सरकारमधील ८ मंत्र्यांनी दिले अचानक राजीनामे
राजीनामा दिलेल्यांमध्ये NPP, UDP, HSPDP आणि BJP या पक्षातील मंत्र्यांचा समावेश
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांचा आज संध्याकाळी शपथविधी होणार
मेघालयातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपप्रणीत या राज्यात १२ मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे. मेघालयातील मंत्रिमंडळातील विस्ताराआधीच अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन यम्बोन, रक्कम ए. संगमा, अबू ताहिर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगदोह आणि किरमेन शायला, एचएसपीडीपीचे शकलियार वारजरी आणि बीजेपीचे ए एल हेक यांच्या नावाचा समावेश आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचं सरकार आहे. या सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री कोनराड संगमा करत आहे.
मेघालयमधील सरकारमध्ये अनेक पक्षांचा समावेश आहे. तिथे 'मेघालय लोकशाही आघाडी युतीचं सरकार आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या युतीची स्थापना झाली. ६० सदस्यांच्या विधानसभेत एकूण १२ मंत्री होते. यापेक्षा अधिक मंत्री मेघालयच्या सरकारमध्ये नसतात. त्यातील ८ जणांनी राजीनामा दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालयच्या सरकारमध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांचा आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. मेघालयातील मंत्रिमंडळातील फेरबदलामागे अनेक कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे. मेघालय लोकशाही आघाडीत संतुलन राखणे, सर्व वर्गांना प्रतिनिधित्व मिळणे, मित्रपक्षांना खूश करण्यासाठी फेरबदल केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीपीचे आमदार वलादमिकी शैला, सोस्थेनिस सोहटुन, ब्रेनिंग ए. संगमा आणि टिमोथी डी शिरा हे नव्याने मंत्रिमंडळात सामील होतील. तसेच यूडीपीचे प्रमुख मेटबाह लिंगदोह आणि माजी मंत्री लखमेन रायम्बुई हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. एचएसपीडीपीचे आमदार मेथोडियस दखर हे शकलियार वारजरी यांची जागा घेण्याची शक्यता आहे. तर भाजपचे सनबोर शुल्लई हे एएल हेक यांची जागा घेतील,असं सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.