Pakistan
PakistanSaam Tv

Pakistan: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट...(पहा Video)

पाकिस्तानमधील सियालकोट शहरात लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना
Published on

वृत्तसंस्था: पाकिस्तानमधील (Pakistan) सियालकोट शहरात लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये मोठा स्फोट (Explosion) झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य सर्वत्र निर्माण झाले आहे. याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ (Video) देखील समोर येत आहेत.

पहा व्हिडिओ-

स्फोटांचा आवाज ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी (Pakistan) वृत्तपत्र डेली मिलापचे संपादक रिशी सुरी यांनी याघटनेविषयी ट्विट (Tweet) केले आहे. सियालकोटच्या लष्करी तळावर अनेक स्फोट होत आहेत. प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी परिसर असल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा-

सर्वत्र आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. यापाठीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही असे ट्विटमध्ये त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर (Social media) या घटनेचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. पाकिस्तानच्या सियालकोट (Sialkot) शहरामध्ये एकापाठोपाठ अनेक वेळा झालेल्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला होता.

Pakistan
मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या; आपसात झालेल्या भांडणातून घडली घटना

लोक घरामधून बाहेर आले आणि घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सियालकोटचा छावणी परिसर हा पाकिस्तानी लष्कराच्या सर्वात जुन्या लष्करी तळांपैकी एक तळ आहे. ते पूर्णपणे शहराला लागून आहे. १८५२ मध्ये ते बांधले होते. एका हिंदी वेबसाईटने याविषाची माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com