Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; १८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

Manish Sisodia News : मागच्या सुनावणीवेळी सिसोदिया यांनी कोर्टाला सांगितले होते की, मला तुरुंगात ठेवून काही फायदा नाही. कथित दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्याविरुद्धचा तपास आधीच पूर्ण झालाय.
Delhi News
Manish SisodiaSaam TV

Delhi News :

दारू घोटाळा प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सिसोदिया यांना आणखी १८ एप्रिलपर्यंत कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Delhi News
Delhi Viral Video: बसमध्ये सीटवरुन दे दणादण! महिलांमध्ये जुंपली; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या| VIDEO व्हायरल

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया सध्या अटकेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीमध्ये त्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही.

मागच्या सुनावणीवेळी सिसोदिया यांनी कोर्टाला सांगितले होते की, मला तुरुंगात ठेवून काही फायदा नाही. कथित दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्याविरुद्धचा तपास आधीच पूर्ण झालाय. तपासात अडथळा आणण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची माझ्याकडून कुठलीही शक्यता नाही.

जर न्यायालयाने मला जामीन देण्याचा निर्णय घेतला तर न्यायालयाच्या कोणत्याही अटींचे पालन करण्यास मी तयार असल्याचं सिसोदियांनी म्हटलं होतं. २६ फेब्रुवारी २०२३ पासून सिसोदिया तुरुंगात आहेत. आज त्यांना जामीन मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं मात्र कोर्टाने त्यांना आणखी १२ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Delhi News
Yavatmal Crime : रात्रीच्या अंधारात चोरट्यांची घरात एन्ट्री; चाकूचा धाक दाखवत ९ लाखांचा ऐवज लंपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com