Maldives Election Result: मालदीवमधील निवडणुकीत मुइज्जू यांनी पुन्हा मारली बाजी; एक तृतीयांश जागांवर चीनप्रेमी पक्षाची हवा

Maldives Election Result: मालदीवममधील लोकसभा निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांच्या पीएनसी पक्षाने मोठा विजय प्राप्त केला आहे. मुइज्जू यांच्या विरोधातील एमडीपी पक्षाला निराशा हाती आली आहे.
Maldives Election Result: मालदीवमधील निवडणुकीत मुइज्जू यांनी मारली बाजी; देशातील एक तृतीयांश जागांवर चीनप्रेमी पक्षाची हवा
Maldives election Saam Digital
Published On

नवी दिल्ली : मालदीवममधील लोकसभा निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांच्या पीएनसी पक्षाने मोठा विजय प्राप्त केला आहे. मुइज्जू यांच्या विरोधातील एमडीपी पक्षाला निराशा हाती आली आहे. त्यामुळे मालदीवमध्ये मुइज्जू यांना सत्ता राखण्यास यश आलं आहे. मालदीवमध्ये चीनप्रेमी पीएनसी पक्षाने ९३ पैकी ६६ जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मालदीवमध्ये रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडलं. मालदीवमधील एकूण ९३ जागांपैकी ६६ जागांवर मुइज्जू यांच्या पिपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाने बाजी मारली. पीएनसी पक्षाने ९० जागांवर उमेदवार उभे केले होते.

या निवडणुकीत मावदीवियन डेमोक्रेटिक पक्षाने फक्त १२ जागा जिंकण्यास यश आलं. यामुळे मालदीवमध्ये पीएनजी पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर ८ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. इतर जागांवर इतर छोट्या पक्षाने मजल मारली आहे.

Maldives Election Result: मालदीवमधील निवडणुकीत मुइज्जू यांनी मारली बाजी; देशातील एक तृतीयांश जागांवर चीनप्रेमी पक्षाची हवा
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट तयार, कोर्टात केव्हा होणार दाखल?

एमडीपी पक्षाचं संसदेतील बहुमत संपुष्टात

मागील वर्षी मोहम्मद सोलिह यांना पराभूत करत मोहम्मद मुइज्जू हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र, त्यावेळी मुइज्जू यांच्या पक्षाकडे बहुमत नव्हते. बहुमत नसल्याने देशात फारसे काही बदल करत आले नाही. निवडणुकीआधी मुइज्जू यांनी देशातील लोकांना बहुमत मिळवून देण्याचे आवाहन केलं होतं.

यादरम्यान, मुइज्जू यांनी चीनधार्जिनी भूमिका देखील घेतली होती. आता मुइज्जू यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्याने विरोधी पक्ष एमडीपी यांचं बहुमत संपुष्टात आलं आहे. मालदीवमध्ये दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com