Petrol Diesel : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त?तुमच्या शहरातील नवीनतम दर पाहा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Latest Price : मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून काही ठिकाणी इंधन स्वस्त झाले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Latest Price
Valsad Fire News : वलसाडच्या सरिगाम GIDC मधील कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट; ३ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 6 पैशांनी स्वस्त होऊन 96.59 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 6 पैशांनी घसरल्यानंतर 89.70 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 0.66 रुपयांनी घसरून 105.96 रुपयांवर तर डिझेल 0.64 रुपयांनी घसरून 92.49 रुपयांवर आले आहे.

यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल10 पैशांनी महाग होऊन 96.57 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल 10 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल (Petrol) 30 पैशांनी वाढून 107.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल (Diesel) 28 पैशांनी महागून 94.32 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Latest Price
Mumbai Crime News : माहेरहून पैसे आणण्यास नकार, सासरच्या मंडळींनी विवाहितेसोबत केलं भयंकर कृत्य

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com