शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

Ganesh Naik Vs Eknath Shinde : काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असे म्हणत गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
Ganesh Naik Vs Eknath Shinde :
Ganesh Naik’s statement at Palghar event triggers fresh political buzz over Shinde rivalrysaam tv
Published On

राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाद सर्वश्रृत आहे. नाईक आणि शिंदे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख आणि सध्याचे उबाठा उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पालघर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Ganesh Naik Vs Eknath Shinde :
Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना टोला मारला आहे. यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उबाठाचे राजन विचारे, नेते विनायक राऊत, माजी मंत्री मनीषा निमकर, उबाठाच्या उपनेत्या, ज्योती ठाकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ganesh Naik Vs Eknath Shinde :
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासासंदर्भात वक्तव्य करताना एकनाथ शिंदे यांचे नाव घेणं टाळत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काही जण पदासाठी तर काही जण लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टोला मारलाय. ठाणे जिल्ह्यामधील शिवसेनेचा इतिहास सांगितला तर पहिले जिल्हाप्रमुख म.धा. जोशी, सतीश प्रधान, साबीर शेख त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर आनंद दिघे होते. नंतर बरेच जण झाले. पण ठाणे जिल्ह्याच्या शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जातो का? तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला गणेश नाईक यांनी लगावला.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेली तरुण पिढी त्यावेळच्या सत्ताधीशांसोबत संघर्ष करत होती. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. मरणाची भीती वाटत नाही. ज्या लोकांना मरणाची भीती वाटत असते, त्यांच्या जीवनात काही अर्थ नसतो, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com