Mahakukbh Mela Stampede: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, PM मोदींचे योगी आदित्यनाथांना एका तासांत २ फोन, घटनेवर लक्ष ठेवून

PM Modi And Yogi Adityanath: कुंभमेळ्यामध्ये सकाळी संगम तीरावर गतिरोधक तुटल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत.
Mahakukbh Mela Stampede: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, PM मोदींचे योगी आदित्यनाथांना एका तासांत २ फोन, घटनेवर लक्ष ठेवून
PM Modi And Yogi AdityanathSaam Tv
Published On

प्रयागराजच्या महाकुंभातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येला शाही स्नान केले जाते. मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर शाही स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पीएम मोदी या घटनेवर लक्ष ठेवून असून त्यांनी जखमींना ताततडीने मदत करण्यात यावी असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

कुंभमेळ्यामध्ये सकाळी संगम तीरावर गतिरोधक तुटल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संगम तीरावर मोठी गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. महिलांना आणि पुरूषांचा श्वास गुदमरला आणि ढकलाढकली झाली. या चेंगराचेंगरीमध्ये १० जणांचा मृ्त्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे.

या घटनेबाबत पीएम मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून सातत्याने अपडेट घेत आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी तासाभरात दोनदा फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली. तसेच घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमींना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahakukbh Mela Stampede: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, PM मोदींचे योगी आदित्यनाथांना एका तासांत २ फोन, घटनेवर लक्ष ठेवून
Mahakumbh 2025: मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमध्ये स्नान करणार असाल तर 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देऊ केली. कुंभ नियंत्रित करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनाही मदत करण्याची ऑफर देण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश प्रशासन मिनिटा-मिनिटावर लक्ष ठेवून आहे. प्रत्यक्षात संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक आखाड्यांनी शाही स्नान रद्द केले आहे.

Mahakukbh Mela Stampede: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, PM मोदींचे योगी आदित्यनाथांना एका तासांत २ फोन, घटनेवर लक्ष ठेवून
Mahakumbh cylinder blast: महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com