Mamta Kulkarni: संन्यासी ममता बॉलिवूडकडे वळणार? ममताची महामंडलेश्वर पदावरुन हकालपट्टी

Mamta Kulkarni: किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वरपदाला आक्षेप घेतला आणि महाकुंभमेळ्यात वादाची ठिणगी पडली
Mamta Kulkarni Mahamandaleshwar
Mamta Kulkarni
Published On

प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभातून दररोज नवा वाद समोर येतोय. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरुन ममता कुलकर्णीची हकालपट्टी करण्यात आलीय. त्याची नेमकी कारणं काय आहेत? ममतामुळे आणखी कोणत्या महामंडलेश्वराला पदावरून हवण्य़ात आलंय. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ऐकलंत य़ा किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वरपदाला आक्षेप घेतला आणि महाकुंभमेळ्यात वादाची ठिणगी पडली आणि अखेर साध्वी ममताची किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी करण्यात आली. ममताच्या हकालपट्टीची कारणं पाहूयात.

Mamta Kulkarni Mahamandaleshwar
Dhirendra Shastri News: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष मिळाला, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य

ममताची महामंडलेश्वरपदावरुन हकालपट्टी का?

ममतावर देशद्रोही प्रकरणातील आरोप असल्याने आखाड्याचा विरोध

आखाड्याच्या परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षेऐवजी महामंडलेश्वरपदाची दिक्षा दिली

ममताला देण्यात आलेलं पद असंवैधानिकच नाही तर सनातन धर्माच्या विरोधी असल्याचं मत

Mamta Kulkarni Mahamandaleshwar
Mahakumbh Mela: महाकुंभात गर्दीचा कहर! लोकांचा जीव वाचवताना पोलिसानं गमावला स्वतःचा जीव

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात स्वतःचं पिंडदान करत ममता कुलकर्णीनं सन्यास घेतला. मात्र ममताचा पट्टाभिषेक करत थेट महामंडलेश्वर पद दिलं. एवढंच नाही तर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी हे नवं नाव देण्यात आलं. त्यामुळे वाद विकोपाला गेला. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठींचीही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.

काम क्रोध मोह मत्सरचा त्याग करून ममता साध्वी झाली खरी...मात्र आता तिचं पद गेल्यामुळे ती सामान्य साध्वी म्हणूनच पुढचं आयुष्य जगणार की पुन्हा सिनेसृष्टीत परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com