Maggie Theft: इन्स्टंट मॅगीची ११ लाखांची पाकीटं झटक्यात गायब, ट्रकचं कुलूप न तोडता डल्ला

Maggie Stolen In Bhopal: १० लाख ७१ हजार रूपयांची मॅगी चोरीला गेल्याची बातमी, सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मॅगीची सुमारे ९० हजार पाकिटे चोरीला गेली. तसेच डिझेलही चोरीला गेले.
Maggie Hiest
Maggie stolen from BhopalYandex
Published On

१० लाख ७१ हजार रूपयांची मॅगी चोरीला गेल्याची बातमी, सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मॅगीची सुमारे ९० हजार पाकिटे चोरीला गेली. आजतकचे रवीश पाल यांनी दिलेल्या वृत्तानूसार, भोपाळमधून मॅगीच्या पाकिटांनी भरलेली ट्रक ओडीशाच्या दिशेने जात होती. या ट्रकमध्ये ९० हजार मॅगीची पाकिटे होती. ज्याची किंमत १० लाखांहून अधिक होती. पण त्यानंतर चोरट्यांकडून ट्रक घेऊन पळ काढण्याचा प्रकार घडला. नक्की घडलं काय? पाहूयात.

ट्रकमधून लाखो रूपयांची मॅगी चोरीला गेली. तो ट्रक भोपाळच्या रहिवासी शब्बीरचा होता. आज तकशी बोलताना शब्बीर म्हणाला, '२८ नोव्हेंबर रोजी, अहमदाबाद गुजरातमधून ट्रक ओडीशाच्या दिशेने जाणार होती. त्यात १० लाख ७१ हजार रूपयांची मॅगीची पाकिटे भरण्यात आली होती. १ डिसेंबरच्या रात्री हा ट्रक भोपाळच्या ११ मैल टोल प्लाझावरून निघाला होता. काही वेळानंतर शब्बीरने ट्रकचालकाला फोन केला. पण फोन बंद होता.

Maggie Hiest
Viral Video: काय सांगता? बाजारात आली पारले-जी बिर्याणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...काहीही

४ डिसेंबरला ट्रकचालकाने शब्बीरला दुसऱ्याच्या मोबाईल फोनवरून कॉल केला. तेव्हा ट्रक चालक आणि ट्रक क्लिनरला काही अज्ञात व्यक्तीने दारू पाजल्याचे समजले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने ट्रक घेऊन पळ काढला. ट्रकचा शोध सुरू केला असता, शब्बीरचा ट्रक कटक परिसरात आढळून आला. यानंतर शब्बीरने पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी ट्रकचा दरवाजा उघडला, मात्र त्यातून मॅगीची पाकिटे चोरीला गेल्याचे समजले. एवढेच नाही तर, ट्रकटचे डिझेलही चोरीला गेले होते.

Maggie Hiest
Viral Video: रॅपिडो चालकाची कमाल! १३ तास काम, महिन्याला ८० हजारांची कमाई, स्टोरी वाचाच

शब्बीरच्या म्हणण्यानुसार ट्रकचालक आणि त्याची ओळख काही दिवसांपूर्वीच झाली होती. भोपाळमध्ये ११ मैल प्लाझा येथून मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजनुसार, ट्रकचा दरवाजा बंद होता. नंतर ५ किलोमीटर पुढे ट्रक गेला, आणि आतून मॅगीची पाकिटं गायब झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शब्बीरचा जबाब नोंदवला. यावरून पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com