
आजकाल तरूणवर्ग आठ तासाची नोकरी नसून, बिझनेसकडे त्यांचा कल वाढत चालला आहे. डिग्री असूनही काही लोक स्वत:चं व्यवयास सुरू करतात, आणि त्यातून बक्कळ कमाई करतात. तर काही अपारकष्ट करून पैसे कमावतात. सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उबर चालवून दिवसाला ८० हजारहून अधिक कमावत असल्याचं सांगते. त्याची कमाई पाहून तुम्ही थक्क तर झाले असालच, शिवाय व्हिडिओमधील उबर ड्रायव्हर आणि व्हिडिओ शुट करणाऱ्या तरूणाचे संवाद ऐकताच उबर ड्रायव्हरचे कौतुक कराल.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक जण त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी क्लिक करून शेअर करतात. व्हायरल व्हिडिओमध्ये बंगळूरूस्थित ड्रायव्हरसोबत तरूण संवाद साधत आहे. यामध्ये तो विशिष्ट कंपनीसाठी दुचाकी ड्रायव्हिंग करत दिवसाला ८० हजार कमावत असल्याचं सांगतो.
व्हिडिओमध्ये तरूण दुचाकी ड्रायव्हरला, 'तुम्ही दिवसाला किती कमावता?' असे विचारतो. त्यावर उत्तर देत, 'महिन्याला ८०-८५ हजार'. त्यावर तरूण 'फक्त रॅपिडो चालवून?'. त्यावर उत्तर देत ड्रायव्हर, 'उबरमधून सुद्धा, १३ तास काम करून. आम्हाला यातून खूप पैसे मिळतात माहितीय का? तरूण अवाक होऊन म्हणतो, 'आम्ही सुद्धा एवढे कमावत नाही. हे काम तुम्ही स्वेच्छेने करत आहात का?' त्यावर दुचाकी ड्रायव्हर, 'हो..स्वेच्छेने करत आहे. मला कुणी बोलणारा नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा झोपणार, आराम करणार.' तेव्हा दुचाकी ड्रायव्हरचं उत्तर ऐकताच त्याने कौतुक केलं.
या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने 'सर तुमच्याप्रति खुप आदर आहे.', तर दुसऱ्याने '१३ तास कठीण परिश्रम करणे सोपे नाही. तर एका युजरने त्याला त्याच्या मेहनीतचे फळ मिळत असल्याचं सांगितलं. तर, आणखीन एका वापरकर्त्याने खुप प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे. असं म्हणत उबर ड्रायव्हरच्या कामाचं कौतुक केलं आहे.
तसेच, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करत दुचाकी ड्रायव्हरचं कौतुक केलं. शर्मा यांनी उबर चालकाबद्दल अभिमान व्यक्त केला, आणि ड्रायव्हरचा उल्लेख दुचाकी ड्रायव्हर नसून 'भारतीय डिजिटल सेवांचे' सदस्य असे म्हटलं आहे.
या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने 'सर तुमच्याप्रति खुप आदर आहे.', तर दुसऱ्याने '१३ तास कठीण परिश्रम करणे सोपे नाही. तर एका युजरने त्याला त्याच्या मेहनीतचे फळ मिळत असल्याचं सांगितलं. तर, आणखीन एका वापरकर्त्याने खुप प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे. असं म्हणत उबर ड्रायव्हरच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसेच, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करत दुचाकी ड्रायव्हरचं कौतुक केलं. शर्मा यांनी उबर चालकाबद्दल अभिमान व्यक्त केला, आणि त्यांचा उल्लेख दुचाकी ड्रायव्हर नसून इंडियन डिजीटल सर्विसचे सदस्य असे म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.