वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या अवस्थेत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

Teacher Caught in Objectionable Act With Woman: मध्यप्रदेशातील शाळेतून संतापजनक बातमी समोर. शिक्षकाला महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. व्हिडिओ व्हायरल.
Teacher Caught in Objectionable Act With Woman
Teacher Caught in Objectionable Act With WomanSaam
Published On
Summary
  • शिक्षक महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळला.

  • विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून व्हायरल केला.

  • पालकवर्ग संतप्त.

मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्यातील उदयनगर संकूलच्या सरकारी प्राथमिक शाळेतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या शाळेत एक शिक्षक महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दोघांना पाहिलं, तसेच व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांनी शिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. शिक्षक बराच काळ, अशा प्रकारचे वर्तन करीत होते, असं स्थानिक मंडळींनी सांगितलं. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार बिसाली ग्रामपंचायतीच्या झिरी मोहल्ला येथील सरकारी प्राथमिक शाळेत घडली आहे. विक्रम कदम असे शिक्षकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी शिक्षकाला त्यांच्या कृतीबाबत फटकारले होते. मात्र, विक्रम यांचे अश्लील वर्तन सुरूच होते.

Teacher Caught in Objectionable Act With Woman
IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

शाळेत विक्रम महिलांच्या गळ्यात हात घालायचे. घटनेच्या दिवशी शिक्षक विक्रम एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले. शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला. हे प्रकरण समोर येताच जिल्हा शिक्षण अधिकारी हरिसिंह भारतीय यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी तपास करण्यासाठी एक पथक रवाना केले आहे.

Teacher Caught in Objectionable Act With Woman
OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिक्षक विक्रम यांनी व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला. या घटनेबद्दल स्थानिक रहिवासी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच दोषी शिक्षकाला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com