Madhya Pradesh : 'रुद्राक्ष' महोत्सवात चेंगराचेंगरी, मालेगावातील महिलेचा मृत्यू; बुलडाण्यातील ३ महिला बेपत्ता

मध्यप्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित 'रूद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे.
Madhya Pradesh Sehore Malegaon Women Death
Madhya Pradesh Sehore Malegaon Women DeathSaam TV

Madhya Pradesh Sehore News : मध्यप्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित 'रूद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. या घटनेत मालेगावातील एका महिलेचा मृत्यू झाला असून बुलडाण्यातील तीन महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Madhya Pradesh Sehore Malegaon Women Death
Pune Police Bharti : मोठी बातमी! पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित; काय आहे कारण?

नेमकं काय घडलं?

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर येथे १६ फेब्रुवारीपासून रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ७ दिवस चालणार आहे. रुद्राक्ष महोत्सवात शिवपुराण कथा होत आहे. त्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा कथावाचन करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १० लाख भाविक सिहोरमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान, महोत्सव सुरू असताना मोफत रुद्राक्षचं वाटप करण्यात आलं. यावेळी रुद्राक्ष घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीतील चेंगराचेंगरी मालेगाव येथील एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगावातील तीन महिला बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या महिलांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Madhya Pradesh Sehore Malegaon Women Death
Thackeray vs Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाचा निकाल; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

कोण आहेत प्रदीप पंडित मिश्रा?

गेल्या वर्षभरात पंडितप्रदीप मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. शिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत. त्याच महत्वाचं कारण म्हणजे रुद्राक्ष मानवी जीवन बदलते आणि पवित्र स्थान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचं महाराज सांगतात.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात सिहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याचं माहिती असताना देखील प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. परिणामी भाविकांची गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com