Madhya Pradesh News : माझ्या आयुष्यात दुसरं कुणी आलंय! बायकोला शिकवलं, नोकरीही मिळाली, आता नवऱ्याला ओळखच देत नाही

Husband Wife Relation : मजुरी करून बायकोला शिकवलं. नर्सिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी गेलेल्या महिलेने आपल्या नवऱ्याला साधी ओळखही दाखवली नाही.
Madhya Pradesh News
Madhya Pradesh NewsSaam Tv

Madhya Pradesh : बायकोला शिकवलं. आयएएस अधिकारी केलं. ज्याने मेहनत करून शिकवलं त्याच पतीविरोधात तक्रार दिली. उत्तर प्रदेशातील या घटनेची अख्ख्या देशात चर्चा सुरू असतानाच, मध्य प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली आहे. मजुरी करून बायकोला शिकवलं. नर्सिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी गेलेल्या महिलेने आपल्या नवऱ्याला साधी ओळखही दाखवली नाही.

अनुपपूर येथे ही घटना घडली. जोहन असं कमनशिबी व्यक्तीचं नाव आहे. त्यानं कर्ज काढून बायकोला शिकवलं. बायको शिकली. नर्सिंगचा कोर्सही पूर्ण केला. ट्रेनिंगला गेली. पण ज्यानं घाम गाळून, मेहनतीनं बायकोला शिकवलं, त्यालाच स्वीकारण्यास बायकोनं नकार दिला. इतकंच नाही तर, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत मजल गेली.

Madhya Pradesh News
Sambhajinagar Fraud Case: एक लाखात कोटींचा पाऊस; फसवणूक करणारा भोंदू ताब्यात, तरुणाला ३ लाखांचा गंडा

चांगली नोकरी मिळाल्यानंतर बायको जोहानला सोडून गेली. याबाबत पीडित जोहानने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तक्रार केली.

मी अशिक्षित आहे. बायकोला शिकण्याची खूप इच्छा होती. तिला अभ्यास करता यावा, पुस्तके आणि इतर गरजेच्या वस्तू घेता याव्यात यासाठी पैसेही खर्च केले. पण आता तिने ओळखही दाखवली नाही. तिने माझी फसवणूक केली आहे, अशी तक्रार जोहानने केलीय.

मीनाक्षीचं आधीच एक लग्न झालं होतं. ती सासरी न राहता तिच्या आईवडिलांसोबतच राहायची. याच काळात आमची भेट झाली. मी कोणालाही न सांगता तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर आम्ही एकत्र राहू लागलो. आम्हाला एक मुलगी देखील आहे, असेही त्याने सांगितले.

Madhya Pradesh News
Himachal Rains: हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...

मीनाक्षी ही स्पर्धा परिक्षांची तयारी करायची. शिक्षक आणि नर्सिंगच्या नोकरीसाठी ती प्रयत्न करत होती. तिच्या शिक्षणासाठी मी १ लाख १५ हजारांचे कर्ज घेतले. यानंतर जीएनएममध्ये तिनं प्रशिक्षण घेतलं. दोन वर्षे मी कर्जबाजारी होतो. तिची निवड झाल्यानंतर मीनाक्षी खांडवा रुग्णालयात रुजू झाली, असे जोहाननं सांगितले.

मीनाक्षीला नोकरी लागल्यानंतर ती बदलली. तिने माझ्याकडे येणं बंद केलं. ती माहेरी राहू लागली.जेव्हा मी तिला आमच्या घरी येण्याबद्दल सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. माझ्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आलंय, तू दुसरी कोण शोधू शकतो असं ती म्हणाल्याचं जोहाननं सांगितलं.

Madhya Pradesh News
Air Strike in Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरले! हॉटेलवर 'एअर स्ट्राइक', ३ जणांचा मृत्यू

जोहान त्याची मुलगी रुहीला घेऊन कामासाठी गुजरातला गेला होता. दरम्यान, मीनाक्षी, तिचा भाऊ आणि अन्य व्यक्ती गुजरातमध्ये माझ्याकडे आले. त्या तिघांनीही मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या मुलीला घेऊन गेले. मीनाक्षीने मला सांगितले की, तिने एका व्यक्तीकडून १.५ लाख रुपये घेतले होते आणि आता ती त्याच व्यक्तीसोबत राहणार आहे, असं जोहानने सांगितले.

मी बायकोच्या शिक्षणासाठी विमा पॉलिसीदेखील मोडली. बायकोला शिकता यावं म्हणून मजुरी करुन पैशांची व्यवस्था केली. परंतु, तिनेच माझी फसवणूक केली. मला माझी मुलगी परत हवी आहे, असं जोहानचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com