Himachal Rains: हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...
Himachal Pradesh Landslide and Rain Update
Himachal Pradesh Landslide and Rain UpdateSaam Tv
Published On

Himachal Pradesh Landslide and Rain Update: हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. शिमल्यातील समरहिल येथील शिव मंदिरात दरड कोसळल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

समरहिल येथील शिव बावडी मंदिराला फागली भागात दरड कोसळल्याने अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. बचाव पथकांनी घटनास्थळावरून दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढले. सहा गंभीर जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे 10 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Himachal Pradesh Landslide and Rain Update
Atal Pension Yojana: तुम्हालाही मिळू शकते दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या 'अटल पेन्शन योजने'चे फायदे

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत किमान 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी शिमला येथे भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली दबून नऊ जणांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की, समर हिल भागातील शिवमंदिर आणि फागली भागातील आणखी एका ठिकाणी भूस्खलनची घटना घडली आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. फागली परिसरात अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. दोन्ही ठिकाणी सुमारे 15 लोक ढिगाऱ्याखाली दबली गेली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Himachal Pradesh Landslide and Rain Update
Fixed Deposit Scheme: SBI ची 400 दिवसांची जबरदस्त FD योजना, दरवर्षी व्याजातून मिळणार इतके पैसे...

600 वर्षे जुन्या नालागड किल्ल्याचा काही भाग कोसळला

शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील 600 वर्षे जुन्या नालागड किल्ल्याचा काही भाग कोसळला आहे. चांद घराण्यातील राजा बिक्रम चंद यांच्या राजवटीत 1421 मध्ये बांधण्यात आलेला हा किल्ला एका टेकडीवर आहे. या किल्ल्याचं रूपांतर नंतर 1995 पासून रिसॉर्टमध्ये करण्यात आलं होतं. हे रिसॉर्ट चंद घराण्यातील हिमाचलचे माजी आरोग्य मंत्री विजेंदर सिंह यांचे निवासस्थान देखील आहे.

दरम्यान, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस 13 प्रवासी घेऊन मंडीतील कांगू-देहर महामार्गावरील सरोस येथे कोसळली. त्यामुळे बस 100 फूट खाली घसरली. बस सुंदरनगरहून शिमल्याकडे जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com