Kuno National Park Latest News: मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात (Madhya Pradesh Kuno Sanctuary) आणखी एका चित्त्याचा (Cheetah) मृत्यू झाल्याची बातमी समोर आहे. गेल्या तीन महिन्यात ८ चित्त्यांचा इथं मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. आफ्रिकेतून आणलेल्या नर चित्ता सूरजचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. कुनो पार्कमध्ये गेल्या चार महिन्यांत आठ चित्ते मरण पावले आहेत, तर या आठवड्यात मरण पावलेला हा दुसरा चित्ता आहे.
सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी मंगळवारी तेजस या नर चित्त्याचा मृत्यू झाला होता. मादी चित्यासोबत झालेल्या हिंसक झुंजीत तो जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, आतापर्यंत कुनो अभयारण्यात (Kuno National Park) ८ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. वारंवार चित्त्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.