
मध्यप्रदेशमधील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यंमत्री डॉ. मोहन यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या गरबा महोत्सव कार्यक्रमात त्यांनी महिलांसाठी घोषणा केली आहे. दिवाळी भाऊबीजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात १५०० रूपये जमा होतील असं म्हटलं आहे.
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी आयोजित केलेल्या गरबा महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करत दिवाळी भाऊबीजपासून लाडकी बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्यात १,५०० रूपये जमा होणार असल्याचं म्हटलं आहे.
नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दुर्गा देवीची पूजा केली. राज्यातील नागरिकांच्या निरोगी आरोग्य आणि समृद्धीसाठी देवीला प्रार्थना केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणातले की, नवरात्र हा केवळ उपासनेचा सण नसून सांस्कृतिक वारसा आणि सहअस्तित्व जपणारा आहे. गरबा आणि दांडिया यामुळे माणसांमाणसांतील उत्साह वाढतो. पारंपारिक पोशाखात खास महिला, पुरूष,लहान मुले गरबा नृत्य सादर करतात. भजने, संगीत यासारखे भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमात त्यांनी लाडक्या बहिणींसह साधूसंतासाठी मोठी घोषणा केली आहे. हमू खेडी टेकडीवर संतांसाठी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. तसेच उज्जैन हे महानगर शहर बनले आहे. याचनिमित्ताने शाजापूरमध्ये उज्जैन, इंदूर, देवास, पिथमपूर आणि मकसी यांचे एकत्र करून महानगर शहराची निर्मिती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.