
MP MLA IT Raid : मध्यप्रदेशच्या सागरमध्ये भाजपचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आयकर विभागाने त्यांच्या घरावर छापा मारला होता. छाप्यादरम्यान आयकर विभागाने दीडशे कोटी रुपये जप्त केले. सोन्यासह अन्य महागड्या गोष्टीही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. छाप्यादरम्यान राठोड यांच्या घरातल्या तलावात तीन मगरी देखील सापडल्या. ही माहिती आयकर विभागाने वन विभागाला दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय माजी नगरसेविक आणि बांधकाम व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या घरीदेखील ईडीने रेड मारली. राजेश केशरवानी यांच्या घरीत पार्क असलेल्या सात महागड्या गाड्या आयकर विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. छाप्यामध्ये २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये १४ किलो सोनं सापडले, ते सुद्धा ईडीने जप्त केले आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरवंश सिंह राठोड यांच्या घरी पैसे आणि मालमत्तेसाठी काही प्राणी देखील आढळले होते. यात ३ मोठ्या मगरींचा समावेश आहे. राठोड यांच्या आलिशान घरामध्ये एक छोटा तलाव आहे. या तलावामध्ये ३ मोठ्या आकाराच्या मगरी असल्याचे अधिकाऱ्यांना समजले. त्यांनी याबाबतची माहिती लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
राठोर कुटुंब आणि केशरवानी कुटुंब एका फर्ममध्ये व्यावसायिक भागीदार आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध देखील आहेत. दोन्ही कुटुंबातील अनेकजण राजकारणात सक्रिय आहेत. ईडीच्या छाप्यामध्ये केशरवानी कुटुंबाकडे १४० कोटी काळा पैसा असल्याचे समोर आले. तर राठोड कुटुंबाकडूनही २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त काळे धन प्राप्त झाले. या कारवाईला दोन दिवस लागले असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.