Naxalites Encounter: बालाघाट जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; २ नक्षली ठार

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोख बक्षीस घेऊन जाणारे २ नक्षलवादी ठार झालेत. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक AK-४७ रायफल, १२ बोअरची रायफल आणि दैनंदिन गरजेच्या काही वस्तू जप्त केल्या आहेत.
Madhya Pradesh News
Madhya Pradesh NewsFile Photo

(शुभम देशमुख)

Naxalites Encounter In Balaghat :

मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी जवानांना मोठे यश मिळाले आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागात बालाघाट पोलिसांनी २ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. (Latest News)

मध्यरात्री झालेल्या चकमकीत दोन पोलिसांकडून बक्षीस असलेले २ नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.काही भागात आणखी नक्षलवादी असण्याची शक्यता असून तेथे चकमक सुरू आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट जवळील केझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान चकमक झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी शोध मोहीम राबवली जात आहे. आज मंगळवारी पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ क्रांती, यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्याच्यावर २९ लाख रुपयांचे बक्षीस होते. हा अनेक घटनांमध्ये सामील होता. केरजझरी जंगल परिसरात गोळीबार सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला आणि दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.

नक्षलवादी रघू उर्फ शेर सिंग एसीएम, याच्यावर १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. या मृत नक्षलवाद्यांकडून एक एके-४७, एक बारा बोअर रायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे बालाघाटचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले. या चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेल्याचेही त्यांनी सांगितले. या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरूच आहे.

मध्यप्रदेश पोलिसांच्या या कामगिरीचं मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. आम्ही नक्षल चळवळ कधीही वाढू देणार नाही. तीन महिन्यांपूर्वी सरकार स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी मोठी चकमक झाली. ज्या सैनिकांनी शौर्य दाखवले त्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. त्यांचा विचार सरकार करेल. त्याच्या पदोन्नतीला इतर सर्व बाबतीत माझा पूर्ण पाठिंबा आहे. हेच आपल्याला जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने नेत आहे.

Madhya Pradesh News
Gadchiroli News : नक्षलवाद्यांचा भारत बंद; छत्तीसगडमध्ये दोन प्रवासी बस पेटवल्या

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com