
Lucknow Latest Crime News : लखनौमध्ये अतिशय क्रूर आणि संतापजनक घटना घडली आहे. धावत्या कारमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर चाकूने सपासप वार करत त्या महिलेचा जीव घेण्यात आला. नराधमाने तिला बळजबरी दारू पाजती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बेठ्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळे लखनमध्ये एकच खळबळ उडाली. आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी लोकांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव लुनहा असे असून ती ब्युटीशियन म्हणून काम करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार,लुनहा हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. आर्यासोबत ती बंथारा येथे राहत होती. ती ब्युटीशियन म्हणून काम करत होती. बुधवारी सायंकाळी नवरा घराबाहेर गेला. त्यावेळी नवऱ्याच्या ओळखीचे काही लोक आले, त्यांनी तिला एका लग्नात मेहंदी काढण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. अजय, विकास आणि रजनीश हे नराधम ओळखीचा फायदा घेत महिलेला घेऊन गेले. प्रवास सुरू झाल्यानंतर कारमध्येच त्या नराधमांनी दारू प्यायला सुरूवात केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्या महिलेची छेड काढण्यास त्यांनी सुरूवात केली. नराधमांनी तिला बळजबरी दारू पाजली. अत्याचार करून चाकूने सपासप वार करत तिचा खून केला.
धावत्या गाडीत अत्याचार अन् विनयभंग केल्याची घटना समोर येताच, गावात संतापाची लाट पसरली. लोकांनी पोलिसांत धाव घेत आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवून गावकऱ्यांनी आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. पोलिसंनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यानंतर गावकऱ्यांचा रोष शांत झाला. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. फरार आरोपाचा शोध घेतला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.