अनिल चौहान नवे CDS; जाणून घ्या त्यांच्याविषयी...

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान हे नवे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) असतील
New india cds
New india cds saam tv

नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान हे नवे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) असतील. केंद्र सरकारने बुधवारी चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होते.

New india cds
PFI Baned : 'पीएफआय'वर बंदी का घातली? केंद्र सरकारने दिलेली 10 कारणे वाचा

बिपिन रावत यांचे गेल्या वर्षी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले होते. त्यानंतर सीडीएस पद रिक्त झाले होते. अखेर नऊ महिन्यांनंतर केंद्र सरकारने अनिल चौहान यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

अनिल चौहान यांच्या नियुक्तीबाबत संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. चौहान हे सरकारच्या संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवपदावरही काम करतील. ते एनएससीएसच्या सैन्य सल्लागार पदावर कार्यरत होते.

गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते या पदावर कार्यरत होते. बालाकोटमध्ये हल्ला झाला होता, त्यावेळी ते डीजीएमओमध्ये होते. ऑपरेशन सनराइजचं श्रेय त्यांना दिलं जातं.

New india cds
PFI प्रमाणे RSS वरही बंदी घातली पाहिजे; लालू प्रसाद यादव यांची मागणी

लष्करात ४० वर्षांहून अधिक अनुभव

सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची सीडीएसपदी नियुक्ती केली आहे. अनिल चौहान यांना लष्करातील सेवेचा जवळपास ४० वर्षांहून अधिक अनुभव आहे. चौहान यांनी अनेक विभागांचं नेतृत्व केलं आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादविरोधी मोहिमांचा त्यांना व्यापक असा अनुभव आहे.

अनिल चौहान यांचा जन्म १८ मे १९६१ रोजी झाला होता. १९८१ मध्ये भारतीय लष्कराच्या ११ गोरखा रायफल्समध्ये ते रुजू झाले होते. ते नॅशनल डीफेन्स अॅकॅडमी खडकवासला आणि भारतीय सैन्य अॅकॅडमी, देहरादूनचे माजी विद्यार्थी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com