PFI प्रमाणे RSS वरही बंदी घातली पाहिजे; लालू प्रसाद यादव यांची मागणी

पीएफआय आणि आरएसएस या दोन्ही संघटनांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली.
PFI प्रमाणे RSS वरही बंदी घातली पाहिजे; लालू प्रसाद यादव यांची मागणी
Published On

पाटना : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) सरकारच्या धडक कारवाईनंतर लालू प्रसाद यादव मोठी मागणी केली आहे. PFI प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS वरही बंदी घातली पाहिजे, असं लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी म्हटलं आहे. पीएफआय आणि आरएसएस या दोन्ही संघटनांची चौकशी झाली पाहिजे. लालू प्रसाद यादव यांच्या मागणीनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही (Modi Government) निशाणा साधला आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. अशात देशात हिंदू-मुस्लीम वाद पेटवून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

PFI प्रमाणे RSS वरही बंदी घातली पाहिजे; लालू प्रसाद यादव यांची मागणी
PFI Baned : 'पीएफआय'वर बंदी का घातली? केंद्र सरकारने दिलेली 10 कारणे वाचा

लालू प्रसाद यादव यांच्याआधी काँग्रेस नेते खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनीही PFI वर बंदी घालण्याची मागणी केली होती. पीएफआयवर बंदी घालणे पुरेसे नाही. आरएसएस देखील जातीयवाद पसरवत असल्याने त्यावर देखील बंदी घातली पाहिजे.

PFI वरील बंदीनंतर काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी RSS वर देखील बंदी घाला अशी मागणी केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे मूर्खासारखे बोलणारे खूप आहेत. आरएसएसबाबत एक तरी प्रकार असा पहिला आहे का? ज्यांच्याकडे अक्कल कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना नाव न घेता लगावला आहे.

PFI प्रमाणे RSS वरही बंदी घातली पाहिजे; लालू प्रसाद यादव यांची मागणी
PFI Ban : 'पीएफआय'सोबत RSS वर देखील बंदी आणा; कॉंग्रेस खासदाराची मागणी

पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांवर बंदी घातली नाही तर, त्यांच्याकडून हिंसाचार घडवला जाऊ शकतो. देशाची अखंडता आणि सुरक्षेला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. असं सांगत केंद्रीय गृहमंत्रालयाने (Central Government) PFI वर वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.

याआधी NIA आणि ED ने PFI वर दोन टप्प्यात छापे टाकून मोठी कारवाई केली होती. पहिल्या फेरीत 16 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले होते. यानंतर 106 जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा एनआयएने 8 राज्यांमध्ये छापे टाकले. पीएफआय गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होती. बुधवारी मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित आठ संस्थांवर बंदी घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com