तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

Lpg Subsidy Income Limit India 2026: केंद्र सरकार आता उत्पन्नाच्या आधारावर गॅस सिलेंडरची सबसिडी देणार आहे... इतकंच नाहीतर याची चाचपणी करण्यासाठी गॅस ग्राहकांना मॅसेजेस पाठवले जातायत... त्यामुळे कोणत्या ग्राहकांची सबसिडी बंद होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
LPG cylinders stacked for distribution as government considers income-based subsidy changes across India.
LPG cylinders stacked for distribution as government considers income-based subsidy changes across India.saam tv
Published On

केंद्र सरकार LPG सबसिडीच्या नियमांत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. एवढंच नव्हे तर गॅस कंपन्यांच्या नावाने ग्राहकांना मेसेजही पाठवण्यात येताहेत. या मॅसेजमध्ये सबसिडी बंद करण्याचा थेट उल्लेख नसला तरी तुमच्या उत्पन्नाबाबत विचारणा करण्यात आलीय. त्यामुळे आता उत्पन्नाच्या आधारावर गॅस सिलिंडरची सबसिडी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आणि याची चाचपणी करण्यासाठीच हे मॅसेजेस गॅसच्या ग्राहकांना पाठवले जात असल्याचं दिसतंय. यामुळे नेमकं काय होण्याची शक्यता आहे ते पाहूयात..

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? (HDR)

केंद्र सरकार एलपीजी सबसिडीच्या नियमांत बदल करण्याची शक्यता आहे. आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांना गॅसवरील सबसिडी मिळणार नाही. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय. आयकर विभागाच्या मदतीनं अशा उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांची यादी तयार करण्यात आलीय. तसंच, मृत व्यक्तींच्या नावावर असलेले किंवा बनावट कनेक्शनही आता कायमचे बंद केले जाणार आहेत. पात्रतेबाबत शंका असल्यास ग्राहकांना सात दिवसांत तक्रार नोंदवावी लागणार आहे. अन्यथा गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता आहे.

खरंतर, आखतातील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधनटंचाईच्या धक्क्यातून देश अजूनही सावरलेला नाही. कारण मार्चमध्ये केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर ६० रुपयांनी वाढवले होते. तर व्यावसायिक सिलेंडरचे दरही तब्बल तीनशे पेक्षा जास्त रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारनं आपला मोर्चा आता१० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांकडे वळवल्याचं दिसतंय. त्यामुळे आयकर विभागाच्या माहितीच्या आधारावर ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com