Lok Sabha Election: कुठे केंद्रीय मंत्री, कुठे माजी मुख्यमंत्री आणि महिला उमेदवार; भाजपच्या दुसऱ्या यादीत आहेत 'या' खास गोष्टी

Lok Sabha Election: कुठे केंद्रीय मंत्री, कुठे माजी मुख्यमंत्री आणि महिला उमेदवार; भाजपच्या दुसऱ्या यादीत आहेत 'या' खास गोष्टी

Bjp Candidate 2n List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केलीय. या यादीत अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने दुसऱ्या यादीत ७२ नावांचा समावेश करण्यात आलाय.

Lok Sabha Election 2024 bjp candidate List :

भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ७२ उमेदवारांची नावे आहेत. भाजपने या यादीत अनेक स्टार उमेदवारांचा समावेश केलाय.दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी २० उमेदवारांची नावे या यादीत जाहीर केली गेली आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एनडीएच्या जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नसतानाही भाजपने यादी जाहीर केलीय. तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही राज्ये या यादीतून वगळण्यात आली आहेत. जाणून घेऊया भाजपच्या दुसऱ्या यादीतील पाच मोठ्या गोष्टी. (Latest News)

स्टार प्रचारक

या यादीत स्टार उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. आता परत केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना बेंगळुरू दक्षिणमधून तिकीट देण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे मुंबई उत्तरमधून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकच्या धारवाडमधून निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंहा हे गुरुग्राम, शोभा करंदलाजे हे बेंगळुरु उत्तर भागातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश

या यादीत काही माजी मुख्यमंत्र्यांचीही नावे आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कर्नालमधून निवडणूक लढवणार आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनाही उमेदवारी देण्यात आलीय. हरिद्वार येथून ते मैदानात उतरणार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्बई हेही रिंगणात आहेत. त्यांना कर्नाटकातील हावेरी येथून तिकीट देण्यात आले आहे.

दुसऱ्या यादीत उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमधील उमेदवारांची नावे नाहीत. याआधीच्या यादीत यूपीमधील ५१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. तर राजस्थानमधील १५ नावांचा समावेश होता. बिहारमध्ये अद्याप युतीचा निर्णय झालेला नाही.

जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून लवकरच बिहारमध्येही उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरचे तिकीट रद्द करण्यात आले असून हर्ष मल्होत्राला तिकीट देण्यात आले आहे. गौतम गंभीरने नुकतेच लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.

१५ महिला उमेदवार

भाजपच्या या यादीत मोठ्या संख्येने महिला उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत १५ महिला उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आणि महाराष्ट्रातील माजी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलंय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com