Political Explainer : सुपरहिट अभिनेता, फ्लॉप नेता; भाजपने सनी देओलचं तिकीट का कापलं?

why sunny deol not getting ticket : शनिवारी भाजपने ८ वी यादी जाहीर केली. त्यात अभिनेता सनी देओलचं गुरदासपूरमधून तिकीट कापलं आहे. राजकारणात दुसरी इनिंग सुरु करणाऱ्या सनी देओलचं तिकीट कापण्यामागचं कारणे जाणून घेऊयात.
Sunny Deol
Sunny DeolSaam Tv

lok Sabha Election 2024 :

देशातील सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योराप करण्यात येत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची यादीही जारी होत आहे. याचदरम्यान, शनिवारी भाजपने ८ वी यादी जाहीर केली. त्यात अभिनेता सनी देओलचं गुरदासपूरमधून तिकीट कापलं आहे. राजकारणात दुसरी इनिंग सुरु करणाऱ्या सनी देओलचं तिकीट कापण्यामागचं कारणे जाणून घेऊयात.

स्वत:च्या मतदारसंघात कमी जाणे

भाजपने पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओलच्या ऐवजी दिनेश सिंह बब्बू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या निवडणुकीत अभिनेता सनी याच लोकसभा मतदारसंघातून जिंकला होता. सनी देओल त्याच्या लोकसभा मतदारसंघात खूप कमी वेळा जात होता. यामुळे गुरदासपूरमधील स्थानिक जनता नाराज होती. गुरदासपूरमधील लोकांच्या गरजेच्या वेळीही सनी देओल अनुपस्थित असायचा.

Sunny Deol
Buldhana Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघात महा लोकशाही विकास आघाडीचा उमेदवार जाहीर

गुरदासपूरमध्ये लागले होते सनी हरवल्याचे पोस्टर

गुरदासपूरमध्ये अनेकदा अज्ञात लोकांनी सनी देओलचे हरवल्याचे पोस्टर लावले होते. त्यानंतरही सनी लोकसभा मतदारसंघात गेला नव्हता. हे देखील भाजपने तिकीट कापण्याचं कारण आहे.

गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील जनता नाराज

भाजपने नमो अॅपच्या माध्यमातून पसंतीच्या उमेदवारांसाठी लोकांकडून फिडबॅक घेतला होता. तसेच कामकाजाचीही माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर मतदारसंघातील त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. भाजपने नमो अॅपच्या माध्यमातून ३ उमेदवारांच्या नावांचा पर्याय सुचवला होता. तसेच सनी देओल प्रती देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Sunny Deol
Thane Lok Sabha Constituency : शिवसेनेचा गड कोण सर करणार? CM शिंदेंच्या होम पीचवर ठाकरेंची फिल्डिंग?

सिनेमाच्या चित्रिकरणात सनी देओल असायचा व्यग्र

सनी देओल नेहमी सिनेमातील चित्रिकरणात व्यग्र असायचा. यामुळे सनी देओलला लोकसभा मतदारसंघात जायला वेळ मिळत नव्हता. यामुळे गुरदासपूरमधील जनता सनी देओलवर नाराज होती. त्यामुळे भाजपने सनी देओलचं तिकीट कापल्याचं समजत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com