भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर (पूर्वीचे ट्वीटर) फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली. यापूर्वी मोदी सरकारने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ओबीसी आरक्षणाचे प्रणेते कर्पूरी ठाकूर यांचा देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मान करणार असल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं. दरम्यान, मोदी सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात दोन नव्हे तर दहा व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग पाहूया संपूर्ण यादी.
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव - 2024
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह - 2024
एमएस स्वामीनाथन - 2024
लालकृष्ण अडवाणी - 2024
कर्पूरी ठाकूर - 2024
नानाजी देशमुख - 2024
भूकेंद्र कुमार - 2024
प्रणव मुखर्जी- 2019
पंडित मदन मोहन मालवीय- 2015
अटल बिहारी वाजपेयी- 2015
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याची स्थापना 1954 साली करण्यात आली होती. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने गौरवण्यात येतं.
अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सन 2019 पर्यंत भारतात 48 जणांना भारतरत्न देण्यात आले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जाहीर करण्यात आलेल्या 5 लोकांची नावे जोडली तर त्यांची संख्या 53 होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.