Hezbollah Leader Killed: लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह टॉप लीडरची हत्या; अज्ञातांचा घरात घुसून गोळीबार

Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali Hamadi Killed: हिजबुल्लाह संघटनेला मोठा झटका लागलाय. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हिजबुल्लाह प्रमुख मोहम्मद अली हमादीची गोळ्या झाडून हत्या केली.
Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali
Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali Hamadi Killedsocial Media
Published On

इजस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम चालू असतानाच हिजबुल्लाहचे प्रमुख मोहम्मद अली हमादी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. लेबनानच्या पश्चिमी बेका परिसरात हमादीची हत्या करण्यात आली. शेख मोहम्मद हमादी आपल्या घराबाहेर उभे असताना दोन वाहनांवर आलेल्या मारेकऱ्यांनी शेख मोहम्मद हमादी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात अनेक गोळ्या हमादी यांना लागल्या आहेत.

Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali
Donald Trump News : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?

गोळीबारीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हमादी यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अज्ञात हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर फरार झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून याच घटनेची चौकशी केली जात आहे. हमादी यांची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. काही वृत्तानुसार, या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. तर काहीजण ही हत्या कौटुंबिक कारणामुळे झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali
Mahakumbh cylinder blast: महाकुंभमेळ्यातील स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात, ई-मेल पाठवत घेतली जबाबदारी

शेख हमादीची हत्येनंतर लेबनानीच्या सैन्याने परिरसरात नाकाबंदी केलीय. तसेच मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान हमास आणि इस्रायल यांच्या युद्धविराम चालू आहे, त्याच दरम्यान हमादी यांची हत्या झालीय. याचा युद्धविरामावर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एफबीआयही हमादी यांचा शोध घेत होते. १९८५ मध्ये पश्चिम जर्मन विमानाचे अपहरण केल्याप्रकरणी त्याचा शोध घेतला जात होता.

Hezbollah Leader Sheikh Muhammad Ali
Turkey Ski Resort Fire : रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! ६६ जणांचा होरपळून मृत्यू, ५१ जखमी

दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्या युद्ध सुरू असताना हमासाच्या बाजुने हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला चढवला होता. हिजबुल्लाहने इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला होता. लेबनॉनहून हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता. इस्रायल सरकारकडून या हल्ल्याची पृष्टी करण्यात आली होती. मात्र या हल्ल्यात कोणतीच जीवितहानी झाली नव्हती. हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी घरी नव्हते,त्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नव्हती. बेरूतच्या दक्षिण उपनगरमधील एका हल्ल्यात हिजबुल्लाह मुख्य हसन नसरल्लाहला ठार झाला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला सुरू केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com