Terror Of Crows: ब्रिटनमध्ये कावळ्यांची दहशत; भयंकर हल्ल्यात विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक जखमी

Terror of crows in this 250 year old girls school: घटनेमुळे सर्वच त्रस्त झाले असून शालेय प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
Terror Of Crows
Terror Of CrowsSaam TV
Published On

Britain Girls School: ब्रिटनच्या साउथ लंडन येथे एका शालेय परिसरात कावळ्यांनी दहशत माजवली आहे. येथून येत जात असलेले शिक्षक, नागरिक आणि विद्यार्थ्यांवर कावळे हल्ला करत आहेत. एक दोन नाही तर कावळ्यांचा आख्खा थवा येथील नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी करत आहे. या घटनेमुळे सर्वच त्रस्त झाले असून शालेय प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. (Latets Crime News)

शाळेकडून ईमेल करत याची माहिती देण्यात आली आहे. डुलविच येथील जेम्स अॅलन्स या गर्ल्स स्कूलमधील ही घटना आहे. शालेय प्रशासनाने आपल्या मेलमध्ये म्हटलं आहे की, शाळेतून येताना जाताना सर्व विद्यार्थ्यांनी आपली विशेष काळजी घ्यावी. कावळ्यांच्या होण्याऱ्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सावध रहावे, असं मेलमध्ये सांगण्यात आलं आहे.

Terror Of Crows
UP Crime News: धक्कादायक! तान्हुल्याला हे जग पाहता आलंच नाही; युपीत ६ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या

कावळे हल्ला का करतायत?

परिसरात असलेल्या झाडांवर काही कावळ्यांचे घरटे आहेत. या घरट्यात त्यांची पिल्ल देखील आहेत. या पिल्लांना येणाऱ्या व्यक्ती त्रास देतील या भवनेनं कावळे नागरिकांना त्रास देतायत. कावळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करत आहेत. आपल्या चोचेने कावळे नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी करतायत.

कावळ्यांच्या हल्ल्याची लोकांमध्ये इतकी दहशत झाली आहे की, ते काही झाले तरी घरातून बाहेर पडताना कोणत्या ना कोणत्या गोष्टीने आपलं डोकं झाकतात. आपल्या डोक्यावर छत्री, हेल्मेट किंवा अन्य कोणत्याही गोष्टीने डोक्याला सुरक्षीत आधार दिल्यावरच घराबाहेर पडतात.

Terror Of Crows
Pimpri Chinchwad Crime: जिथे घातली दहशत तिथेच उतरवला माज; तळेगावात पोलिसांनी काढली किटक टोळीची धिंड

परिसरातील एका व्यक्तीने आपला प्रसंग सांगताना म्हटलं आहे की, माझ्यावर कावळ्यांनी फार भयंकर हल्ला केला आहे. त्यांनी माझ्या कपाळावर आणि डोक्यावर जास्त प्रमाणावर चोच मारली. टनक चोचमारूण त्यांनी डोक्याच्या त्वचेला मोठी हाणी पोहचवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com