Petrol Diesel Price 20 July: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price Today 20 july 2023: गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.
Petrol Diesel Prices Today
Petrol Diesel Prices TodaySaam TV
Published On: 

Petrol Diesel Price in Marathi:  ब्रेंट क्रूडचे भाव स्थिर असले तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल होत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अजूनही 80 डॉलरच्या आसपास स्थिर आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

Petrol Diesel Prices Today
Khalapur Landslide: रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

पटनामध्ये पेट्रोल (Petrol) 35 पैशांनी वाढून 107.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी वाढून 94.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्येही आज पेट्रोल 40 पैशांनी महाग होऊन 97.11 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल (Diesel) 38 पैशांच्या वाढीसह 89.97 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. एनसीआरच्या नोएडा-गाझियाबादसारख्या शहरांमध्ये आजही कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Prices Today
Irshalwadi Landslide: मी घरात बसलेली, अचानक जोरात आवाज झाला; बाहेर बघितलं तर... महिलेने सांगितला धडकी भरवणारा प्रसंग

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.