बिहारमध्येही लाडकीचा डंका, बिहारची लाडकी गेमचेंजर?

Ladki Scheme Influenced Bihar Election Results: महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही लाडक्या बहिणी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरल्या आहेत... त्यातून निवडणूक जिंकण्याचा नवा पॅटर्न समोर आलाय.. हा निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न कसा सेट केला जातोय. आणि लाडकीने बिहारमध्ये विरोधकांचा कसा सुफडा साफ केलाय?
“Bihar women voters turning into a decisive force as the Ladki scheme reshapes the political battleground.”
“Bihar women voters turning into a decisive force as the Ladki scheme reshapes the political battleground.”Saam Tv
Published On

२९ ऑगस्टला एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या घोषणेचं ७५ दिवसांनी मिळालं फलित म्हणजे एनडीएला निवडणुकीत मिळालेलं छप्परफाड यश...महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही लाडकी बहीण अखेर गेमचेंजर ठरली.....एनडीएने 243 पैकी 200 जागा पटकावल्या कमल आणि तीरच्या धुरळ्यात कंदीलाची वात पार विझून गेली...कारण ऐन निवडणुकीच्या आधी 75 लाख महिलांच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा करण्यात आले..... आणि या योजनेनं सगळी गणितच फिरवून टाकली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीए सरकारने बिहारमध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी 75 लाख महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये तर दीड लाख महिलांना आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलंय.. या योजनेनंतर लाडक्या बहिणी घराबाहेर पडल्या... आणि तब्बल 71 टक्के महिलांनी मतदान केलंय. त्याचेच पडसाद निकालात दिसून आलेत..

महाराष्ट्रातही लाडक्या बहीणींनी महायुतीला मोठा कौल दिला...त्यात महायुतीला 230 जागा मिळाल्या... निवडणुकीआधी बिहारमध्ये निवडणुकीचे अनेक मुद्दे गाजलेले असले तरी अगदी महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही लाडक्या बहीणींनी एनडीएला कौल दिलाय. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर आकर्षक योजना जाहीर करत थेट मतदारांना रोख लाभ देण्यामुळे निवडणुका जिंकण्याचा नवा पॅटर्न सेट होण्याची शक्यता आहे...हा पॅटर्न निवडणूक जिंकण्यासाठी फायद्याचा दिसत असला तरी सुदृढ लोकशाहीसाठी मारक ठरणार, हे मात्र निश्चित..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com