जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या मच्छिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. हा प्रयत्न सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला. जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ (LoC) भूयार खोदून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील दोघे मारले गेले. तर भारतीय जवानांना बघून पळता भुई थोडी झालेल्या अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. (Latest Marathi News)
सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलीस आणि लष्कराच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. त्याचदरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना हेरलं.
त्यांना जवानांनी चहूबाजूंनी घेरलं. त्यांना शरण येण्यास सांगितलं. त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
सुरक्षा दलाच्या जवानांनी जशास तसे उत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना टिपलं. त्यांच्याकडे शस्त्रे आणि पाकिस्तानी चलनही सापडले.
आजूबाजूच्या परिसरात आणखी काही पाकिस्तानी दहशतवादी लपून बसलेले असू शकतात, असा संशय सुरक्षा दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज राजौरी जिल्ह्यातील ढांगरी गावात लश्कर ए तोयबाने केलेल्या हल्ल्याशी संबंधित घटनेप्रकरणी पुंछ जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारले. यात आक्षेपार्ह डेटा आणि अनेक डिजिटल उपकरणे आणि दस्तावेज यंत्रणेच्या हाती लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.