
भारतात विवाह हे पवित्र बंधन मानले जातो पण गेल्या काही वर्षांत अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वेळा घटस्फोटाचे कारण खूप विचित्र असते. आता अशीच एक घटना पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे समोर आली आहे. याठिकाणी पत्नीचे मित्र आणि तिचे कुटुंबीय पतीच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या घरात राहत होते. यामुळे कंटाळलेल्या पतीने थेट कोर्टात धाव घेतली. १६ वर्षे याप्रकरणावर खटला सुरू होता. अखेर कोलकाता हायकोर्टाने पतीला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली.
कोलकाता हायकोर्टाने एका विवाहित महिलेचा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तिच्या पतीच्या घरी त्याच्या इच्छेविरुद्ध दीर्घकाळ मुक्काम करणे क्रूरता असल्याचे मत व्यक्त केले आहे. १९ डिसेंबर रोजी हायकोर्टाने एका व्यक्तीला क्रूरतेचे कारण देत घटस्फोट घेण्यास परवानगी दिली. कोर्टाने सांगितले की, 'एका महिलेने तिच्या पतीच्या इच्छेविरुद्ध आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि तिच्या मैत्रिणींना आपल्या घरामध्ये ठेवले. पती त्याठिकाणी उपस्थित नसेल तर हे निश्चितपणे क्रूरता आहे. कारण यामुळे पतीचे जीवन असंभव होऊ शकते, जे क्रूरतेच्या व्यापक कक्षेत येते.', असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या ३ वर्षानंतर पतीने २००८ मध्ये कोर्टात धाव घेत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्याचे लग्न पश्चिम बंगालमधील नबद्वीप येथे झाले होते आणि २००६ मध्ये ते कोलाघाट येथे राहायला गेले. याठिकाणी ते काम करत होते. २००८ मध्ये या व्यक्तीची पत्नी कोलकाता येथील नरकेलडांगा येथे राहायला गेली आणि तिने दावा केला की हे ठिकाणी तिच्या कामाच्या ठिकाणाजवळ आहे आणि याठिकाणी सर्व सुविधा आहेत. पण चौकशीदरम्यान तिने दावा केला की, ती आपल्या पतीपासून दूर यासाठी झाली कारण ती असह्य झाली होती.
पत्नीने २००८ मध्ये पतीचे कोलाघाट येथील घर सोडल्यानंतरही तिचे कुटुंब आणि एक मैत्रिण तिथेच राहत होते. यानंतर २०१६ मध्ये पत्नी उत्तरपारा येथे शिफ्ट झाली. ते वेगळे राहत असूनही पत्नीचे कुटुंबीय तिच्या सासरच्या घरात राहत असल्याच्या कारणावरून पतीने क्रूरतेचा आरोप केला आणि कोर्टात धाव घेतली. पतीने आरोप केला की, माझ्या पत्नीला वैवाहिक संबंध ठेवण्यास किंवा मूल होण्यात रस नाही.या प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने या व्यक्तीला घटस्फोट घेणयास परवानगी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.