कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे सध्या सगळीकडे संतापाची लाट आहे. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आंदोलनं केली जात आहेत. अशामध्ये या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर फक्त बलात्कार झालेला नसून सामूहिक बलात्कार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरवर फक्त एकाच व्यक्तीने बलात्कार केला असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले होते. पण पोर्स्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब उघड झाली आहे. पीडितेवर एका व्यक्तीने नाही तर अनेकांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती उघड झाली आहे. सुवर्ण गोस्वामी यांनी महिला डॉक्टरच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. मृत डॉक्टरच्या शरीरात १५० मिलीग्रॅम सिमन मिळाले. हे सिमन एका व्यक्तीचे नाही. डॉक्टरवर ज्यांनी बलात्कार केला त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितले आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय (३५ वर्षे) या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे सांगितले जात होते. पण आता या प्रकरणात एक नाही तर अनेकजण सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे देशभरातील अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आंदोलन केले. या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन केले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये बुधवारी मध्यरात्री मोठा राडा झाला. शेकडोच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी मेडिकल कॉलेजमध्ये लावलेले बॅरिकेड्स तोडले. मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केली. मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड केली. आंदोलक डॉक्टरांना मारहाण करून मेडिकल कॉलेजच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संतप्त जमावाने रुग्णालयातील आपत्कालीन कक्षाची देखील तोडफोड केली. महिला डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येला न्याय मिळावा या मागणीसाठी 'रिक्लेम द नाईट्स' निषेध रॅली काढण्यात आली तेव्हा ही तोडफोड झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.