Amritpal Singh News : इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही.., खलिस्तान समर्थकाने दिली उघड धमकी

पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली आहे.
Amritpal Singh Threat to Amit Shah
Amritpal Singh Threat to Amit ShahSaam TV

Amritpal Singh Threat to Amit Shah : पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली आहे. खलिस्तानी चळवळीच्या विरोधात जाल तर इंदिरा गांधी यांना चुकवावी लागलेली किंमत तुम्हालाही चुकवावी लागेल, अशी उघड धमकी त्याने दिली आहे. इतकंच नाही, तर अमित शहा यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचं समर्थन केलं, तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतील हे देखील पाहून घेऊ असंही तो म्हणाला. (Latest Marathi News)

Amritpal Singh Threat to Amit Shah
Delhi MCD News : दिल्ली महापालिकेत तुफान राडा; AAP नेत्याने थेट BJP नगरसेवकाच्या कानाखाली मारली, VIDEO व्हायरल

पंजाबमधील (Panjab) 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस (Police) ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात ६ पोलीस गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये एका मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.

'इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी खलिस्तान चळवळ पुढे जाऊ देणार नाही, असे सांगितले होते. इंदिरा गांधींनीही असेच केले होते. तुम्हीही असेच केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांसाठी गृहमंत्र्यांनी असेच म्हटले तर ते गृहमंत्रीपदावर राहू शकतात की नाही ते मी बघेन, अशी उघड धमकी अमृतपाल सिंह याने दिली.

Amritpal Singh Threat to Amit Shah
Kasba Bypoll Election : सत्ता आमच्या डोक्यात जात नाही! देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

'आम्हाला कोणीही रोखू शकत नाही'

जेव्हा लोक हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत, असं खुलं आव्हान देखील अमृतपाल सिंह याने सरकारला दिलं आहे.

दरम्यान, अमृतपाल सिंह पाल याने गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्याने एका कार्यक्रमात अमित शाह यांना धमकी दिली होती आणि पंजाबचा प्रत्येक तरुण खलिस्तानबद्दल बोलत असल्याचं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच खलिस्तान समर्थकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com