Wayanad Landslides: वायनाडमध्ये मृत्यूतांडव; भूसख्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरू

Kerala Wayanad Landslides Updates Over 300 Killed: वायनाडमध्ये झालेल्या भूसख्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तर सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळतेय.
वायनाड भूसख्खल
Wayanad LandslidesSaam Tv
Published On

मुंबई: केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू झालाय. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ३०८ लोकांचा मृत्यू झालाय. वायनाडमधील भूस्खलनग्रस्त चूरलमाला येथे सलग चौथ्या दिवशी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

भूसख्खलनात ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू

केरळमधील (Kerala) वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनानंतर येथील जवळपास चार गावे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर मोठ्या संख्येने लोक जखमीही झाल्याची माहिती मिळत (Kerala Wayanad Landslides Updates) आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वायनाडमध्ये भीषण मृत्यूतांडव

आतापर्यंत येथे ३ हजार लोकांची सुटका करण्यात आलीय. मुसळधार पावसात चिखल, खडक आणि पडलेली झाडे यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. लष्कराचे जवान चुरलमाला आणि मुंडक्काई दरम्यान कोसळलेल्या पुलाचे पुनर्बांधणी काम करत आहेत. सोमवार-मंगळवारची मध्यरात्र साखरझोपेत असलेल्या वायनाडसाठी काळरात्र ठरली आहे. या दुर्घटनेत शेकडो घरे जमीनदोस्त झाली (Kerala Wayanad Landslides) आहेत.

वायनाड भूसख्खल
Wayanad Landslides Update : वायनाडमध्ये जिथे भीषण विध्वंस, तिथे पोहोचले राहुल गांधी; २७७ जणांचा मत्यू, २०० जण अजूनही बेपत्ता

सलग चौथ्या दिवशी बचावकार्य सुरू

भारतीय लष्कराने वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात बचावकार्य तीव्र केलंय. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) ऑपरेशन अंतर्गत, भारतीय सैन्याने वायनाडमधील भूस्खलनानंतर बचावकार्य वेगात सुरू केलं (Wayanad Landslides) आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ४८३ लोकांचा मृत्यू झाला होता.

वायनाड भूसख्खल
Kalyan Land scam: कल्याणमधील 63 एकर जमीन बिल्डरच्या घशात, 7000 कोटींचा घोटाळा; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com