बीवी हो तो ऐसी... कुंकवाला वाचवण्यासाठी बायकोनं जिवाची बाजी लावली, सावित्रीसारखं नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं

Kerala News : नवऱ्याला वाचवण्यासाठी बायकोने जिवाची बाजी लावली. महिलेचं शौर्य आणि समजूतदारपणाची केरळमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
Kerala News
Kerala News Saam tv
Published On

Brave Kerala Woman Rescues Husband : आपल्याकडे नवरा आणि बायकोचं नाते पवित्र मानले जाते. या नात्यात आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आणि काळजी असतेच. एकमेकांसाठी जिवाची बाजी लावतात. नवऱ्याला वाचवण्यासाठी बायकोने जे केले ते आज चर्चेचा विषय आहे. नवरा ४० फूट खोल विहिरीत पडला, त्याला वाचवण्यासाठी बायकोनं जे काही केलं, त्याची केरळमध्य चर्चा होत आहे. नवरा विहिरीत पडल्यानंतर बायकोने दोरीच्या मदतीने विहिरीत उतरली अन् जोपर्यंत मदत येत नाही, तोपर्यंत हात धरूनच थांबली. त्यानंतर नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारी अधुनिक सावित्री म्हणून तिची चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील पिरामोमधील महिलेनं शौर्य आणि समजूतदारपणामुळे नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवले. शेतात काम करत असताना रमेशन (वय ६४) यांचा तोल गेला अन् ४० फूट खोल विहिरीत कोसळला. त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या, त्यामुळे वरती येण्यास अडचण येत होती. नवऱ्याचा जीव जातोय की काय हे कळताच पत्नीने आपल्या जिवाचा विचार न करता वाचवण्याचा निर्णय घेतला. दोरी झाडाला बांधली अन् त्यानंतर विहिरीत उतरली. नवऱ्याला हात देत धीर दिला. जोपर्यंत बचावपथक येत नाही,तोपर्यंत नवऱ्याचा हात सोडला नाही. बचाव पथकाने दोघांना वाचवले, त्यानंतर उपचार करण्यात आले.

Kerala News
Toll Pass: आता फक्त ३००० रुपयांत मिळणार वर्षभराचा टोल पास; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बचाव पथकामधील अधिकाऱ्याने सांगितले की, रमेशन हे आधीपासूनच आजारी होते, त्यात वाढते वय. शेतात काम करताना तोल गेला अन् विहिरीत पडले. विहिरीत पडल्यामुळे बेशुद्ध झाले होते. पती विहिरीत पडताना पाहून पद्मम (वय ५६) दोरीच्या मदतीने ताबडतोब विहिरीत उतरली. दोरीवरून उतरल्याने आणि बराच काळ दोरीलाच धरून राहिल्याने त्यांचा हात गंभीरपणे जखमी झाला. पण नवऱ्याला वाचवण्यासाठी तिने हिम्मत सोडली नाही. जवळपास अर्धा मिनिट दोरीच्या साह्याने नवऱ्याचा हात धरून विहिरीत होत्या. विहीर निमूळती आणि खोल असल्यामुळे या जोडप्याला काढताना कसरत करावा लागली.

Kerala News
Crime News: 'वडिलांच्या मृतदेहाचे दोन भाग करा, एका भागाचे तो अंत्यसंस्कार करेल आणि..' अंत्यसंस्कारावरून २ सख्ख्या भावांमध्ये राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com