Toll Pass: आता फक्त ३००० रुपयांत मिळणार वर्षभराचा टोल पास; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Annual And Lifetime Toll Pass: नॅशनल हायवेवरुन नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता वर्षभराचा आणि आजीवन टोल पास मिळणार आहे.
Toll Pass
Toll PassSaam Tv
Published On

नॅशनल हायवेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हायवेवरुन सतत प्रवास करणाऱ्यासाठी सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. सरकार लवकरच वार्षिक टोल पास देण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच तुम्हाला वर्षभरासाठी टोल पास मिळणार आहे.

आनंदाची बातमी म्हणजे वर्षभराच्या या पाससाठी फक्त तुम्हाला ३००० रुपये भरावा लागणार आहे.याचसोबत तुम्ही आजीवनदेखील पास मिळवू शकतात.म्हणजेच १५ वर्षांसाठी तुम्ही ३०,००० रुपयांचा पास देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी टोल भरण्याची गरज नाही. (Anuual And Lifetime Toll Pass)

Toll Pass
Toll Tax: देशभरात सगळीकडे एकसारखाच टोल होणार, नितीन गडकरींची माहिती

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या वार्षिक आणि आजीवन टोल पासबाबत प्रस्ताव रस्ते मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. याबाबत सरकार विचार करत आहे. दरम्यान, नॅशनल हायवेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मंत्रालय खाजगी कारसाठी प्रति किली टोल दरात बदल करण्याच्या विचारात आहे, असंही सांगण्यात येत आहे.

नवीन पास खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही वेगळे करावे लागणार नाही. तुमच्या फास्टॅगमध्ये एम्बेड केले जाईल. सध्या स्थानिक प्रवाशांना एकच टोल प्लाझा ओलांडण्यासाठी मासिक पास दिले जातात. या पासची किंमत दर महिन्याला ३४० रुपये आहे. म्हणजेच वर्षासाठी ४,०८० रुपये आहे. त्यामुळेच हा नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे.

Toll Pass
Post Office Scheme: या सरकारी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला ९२५० रुपये मिळवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

यामुळे संपूर्ण वर्षासाठी एका टोल प्लाझासाठी ३००० रुपयांची पास दिला जाऊ शकतो. यामुळे वाहनधारकांचे पैसेही वाचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितके की, कार मालकांना वार्षिक पास देण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यामुळे अनेक समस्या दूर होतील.

२०२३-३४ मध्ये एकूण ५५,००० कोटी रुपये टोल महसूल जमा झाला आहे. त्यापैकी खाजगी गाड्यांचा टोल ८००० कोटी रुपये आहे. ५३ टक्के व्यव्हार हे खासगी कारसाठी झाले.

Toll Pass
LIC Scheme: केंद्राची महिलांसाठी खास योजना! महिन्याला मिळणार ७००० रुपये; विमा सखी योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com